मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Life@25 : ज्योतिषी म्हणाला होता, IAS नाही होऊ शकत; मात्र, पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रपुत्राने...

Life@25 : ज्योतिषी म्हणाला होता, IAS नाही होऊ शकत; मात्र, पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रपुत्राने...

नवजीवन पवार हे 2019च्या बॅचचे अधिकारी आहेत.

नवजीवन पवार हे 2019च्या बॅचचे अधिकारी आहेत.

नवजीवन पवार हे 2019च्या बॅचचे अधिकारी आहेत.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 सप्टेंबर : महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यातच नव्हे तर देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे तरुण मराठी अधिकाऱ्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अनुभवाचा मराठी तरुणाईला प्रेरणा मिळावी, या हेतूने न्यूज 18 लोकमत डिजिटल खास तरुणाईसाठी Digital Prime Time Special लाइफ @25 हा विशेष कार्यक्रम सुरू करत आहेत. आज जाणून घेऊयात, मराठी मातीत जन्माला आलेले, नाशिक जिल्ह्यातील बेज (ता. कळवण) येथील सुपूत्र आणि सध्या मध्यप्रदेश राज्यात सेवा बजावत असलेले आएएस अधिकारी नवजीवन पवार यांच्याबाबत. नवजीवन पवार हे 2019च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते मध्यप्रदेश राज्यातील कुक्षी येथे SDM पदावर कार्यरत आहेत. 2019 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवित IAS रँक मिळवली. नवजीवन पवार हे मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी उपसभापती विजय पवार यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी अवघ्या 23व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. नवजीवन यांचे प्राथमिक शिक्षण शहरातील निर्मला कॉन्व्हेंट येथे झाल्यानंतर पुढील शिक्षण महाबळेश्वर व इंजिनीअरिंगच्या पदवीचे शिक्षण पुणे शहरात झाले होते. यानं त्यांनी पुण्यातील सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हील शाखेतील पदवी संपादन केली. शिक्षानंतर ते यूपीएससी परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. अवघ्या वर्षभरात नियोजपूर्वक अभ्यास करीत पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परिक्षेत महाराष्ट्राचे नाव उंचावले. यानंतर मध्यप्रदेशातील श्योपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. कुक्षी येथे SDM पदावर कार्यरत आहेत. ज्योतिषी म्हणाला, -...तोपर्यंत आएएस होऊ शकणार नाहीस - टाईम्स नाऊने दिलेल्या अहवालानुसार, नवजीवन पवार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, दिल्लीतील त्यांचे शिक्षक त्यांना एकदा ज्योतिषाकडे घेऊन गेले. यावेळी ज्योतिषीने त्यांना सांगितले होते की, वयाच्या 27व्या वर्षापूर्वी तू IAS बनू शकणार नाहीस. ही गोष्ट नवजीवन यांना खटकली आणि त्यांनी या परीक्षेत नक्कीच उत्तीर्ण होणार, असा निर्धार केला. हेही वाचा - Life@25 : खान्देशचे सुपूत्र IAS अधिकारी मनोज महाजन ओडिशात बजावताएत सेवा, तरुणाईला देतात 'हा' सल्ला
मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन होते. त्यांच्या शिक्षणासाठी एका टप्प्यावर माझ्या आवडीच्या राजकारण या विषयातून मी पूर्णत: लक्ष काढून घेतले. तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगती व प्रोत्साहनावर केंद्रित केले. मुलांनी या निर्णयास कतृत्वाने प्रतिसाद दिल्याने आज पूर्ण कुटुंबाला समाधान वाटते, असे नवजीवन यांचे वडील व मविप्र समाजाचे माजी उपसभापती विजय पवार हे सांगतात.
First published:

Tags: Career, Ias officer, Nashik

पुढील बातम्या