महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे...शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. तर दुसरिकडं मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदरांची बैठक झाली. या बैठकीला 15 आमदार उपस्थित होते. त्याचवेळी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या 18 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. शिवसेनेनेच केलं ऑपरेशन लोटस? मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर 20 तासांमध्येच यूटर्न का? एकनाथ शिंदे आणि सोबत असलेल्या आमदारांना सर्वात आधी महाराष्ट्रात येऊ द्या ,असंतोष तयार करून आमदार वळवता येतात का ते तपासा आणि तोपर्यंत तांत्रिक मुद्द्यांवर पेच वाढवत न्या, असा सल्ला महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांनी दिलाय. त्यानंतर राऊत यांनी शिंदे समर्थक आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानं सत्तासंघर्षाला नवं वळण मिळालं आहे.'आम्ही कट्टर शिवसैनिक; ठाकरे आमचे नेते, पण एकनाथ शिंदे सांगतील ती आमची दिशा' - गुवाहाटीतल्या हॉटेलमधून शिवसेना आमदार चिमणराव पाटील. गुवाहाटीत आमदारांच्या गोटात कसं आहे वातावरण - ऐका Inside Audio pic.twitter.com/NalfBT483F
— News18Lokmat (@News18lokmat) June 23, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shivsena