मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mharashtra Cold Wave : राज्यात थंडीची लाट ओसरली पण, पुण्यासह मराठवाडा, विदर्भात गारठा कायम

Mharashtra Cold Wave : राज्यात थंडीची लाट ओसरली पण, पुण्यासह मराठवाडा, विदर्भात गारठा कायम

उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली असतानाच, महाराष्ट्रात किमान तापमानात काही प्रमानात वाढ झाली आहे.

उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली असतानाच, महाराष्ट्रात किमान तापमानात काही प्रमानात वाढ झाली आहे.

उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली असतानाच, महाराष्ट्रात किमान तापमानात काही प्रमानात वाढ झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 17 जानेवारी : राज्यात जानेवारीच्या सुरूवातीपासून राज्यात थंडी वाढायला सुरू झाली आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली असतानाच, महाराष्ट्रात किमान तापमानात काही प्रमानात वाढ झाली आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कायम आहे. आज (ता.17) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता आहे.

देशाच्या उत्तरेत आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर जोरदार होत आहे. वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तर भागात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आहे. काल (ता. 16) धुळे येथील कृषी महाविद्यालय व निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हे ही वाचा दिल्ली, गुजरात, मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब, हे आजार वाढण्याचा धोका

जळगाव, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा खाली असून उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमानातही वाढ-घट सुरूच असून, तापमानाचा पारा 26 ते 34 अंशांच्या आसपास आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 33.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

दरम्यान राज्यात मागच्या 24 तासांमध्ये पुणे 31.4 (10.8), जळगाव 27.0 (10), धुळे 26 (6.5), कोल्हापूर 31.3 (16.9), महाबळेश्वर 26.8(13), नाशिक 29.5 (10.5), निफाड 30.5 (6.5), सांगली 31.1 (15.1), सातारा 31.9(12.7), सोलापूर 33.7 (15.5), रत्नागिरी 29 (16), औरंगाबाद 29.8 (10), परभणी 30.5(15), अकोला 30.6 (15.2), अमरावती 29.8 (13), बुलडाणा 28 (13.8), ब्रह्मपुरी 30.2 (14.5), चंद्रपूर 28.6 (16.2), गडचिरोली 30.4(14.4), गोंदिया 27(11.5), नागपूर 28.1 (13.8), वर्धा 29.4(14.4), तापमानाची नोंद झाली.

हे ही वाचा : 100 वर्षांचा रेकॉर्ड मोडणार, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट येणार

याचबरोबर आज (ता. 17) राजस्थान, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

मागील पंधरवड्यापासून संपूर्ण उत्तर भारत हाडे गोठवणाऱ्या थंडीच्या लाटेचा अनुभव घेत आहे. राजधानी दिल्ली तर दीड अंश तापमानापर्यंत खाली आहे. काश्मीर व हिमाचलात तापमान उणे 2 ते 4 अंशांपर्यंत पोहोचले आहे; पण उत्तर भारतातील पठारी अद्याप तापमान 5 अंशाच्या खाली न आल्याने थंडीची लाट सोम्य आहे. परंतु पुढच्या काही दिवसांत उत्तर भारताच्या पठारी भागांत तापमान उणे 4 अंश इतके खाली जाण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.

First published:

Tags: Mumbai, Nagpur, Pune (City/Town/Village), Weather, Weather forecast, Weather update, Winter, Winter session