मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : तांडव नृत्यानं गाजवली विसर्जन मिरवणूक, महादेवांना पाहण्यासाठी मोठी गर्दी VIDEO

Nashik : तांडव नृत्यानं गाजवली विसर्जन मिरवणूक, महादेवांना पाहण्यासाठी मोठी गर्दी VIDEO

महागणपती शिवसेवा मित्र मंडळ आयोजित भगवान शंकरांचे तांडव नृत्य हे नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

नाशिक 9 सप्टेंबर : आज अनंत चतुर्दशीलाAnant Chaturdashi 2022 ) गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. दहा दिवस बाप्पाची भक्तिभावाने सेवा केल्यानंतर जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. यामुळे राज्यभरात गणेशाचे विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहिला मिळत आहे. नाशिकमध्ये ( Nashik ) विविध मंडळाच्या भव्य विसर्जन मिरवणुकां निघाल्या असून ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचा जयजयकार केला जात आहे. जवळपास 50 ढोल पथक या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. या मिरवणुकीत मुख्य आकर्षण ठरलं ते नाशिकच्या महागणपती शिवसेवा मित्र मंडळ आयोजित भगवान शंकरांचे तांडव नृत्य. हे तांडव नृत्य करण्यासाठी खास हरियाणा वरून 20 जणांचे पथक आले होते. यात महाकाय भगवान शंकर ही अवतरले होते. तसेच त्यांच्या सोबत हनुमान आणि त्यांची वानर सेना देखील होती. तांडव नृत्य बघण्यासाठी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केली होती. हे पथक विविध कला देखील सादर करते. यावेळी तोंडातून आगीचे लोळ काढणे तसेच विविध उड्यांचे प्रदर्शन ही बघायला मिळाले. हेही वाचा : Akola : पुढच्या वर्षी लवकर या…! भावुक वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप, पाहा VIDEO महागणपती शिवसेवा मित्रमंडळ दरवर्षी अनोखे सादरीकरण करते हे मंडळ दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत विविध कलाकारांना बोलवत असतं. परराज्यातून कलाकारांना बोलावलं जातं. गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी शेकडो नागरिक हजर असतात. पारंपारिक वाद्य असतातच मात्र अशा कलांमुळे आपल्या संस्कृतीला ही चालना मिळते आणि नागरिकांचे मनोरंजन होते. नाशिकच्या महागणपतीवर नागरिकांचे प्रचंड प्रेम आहे. दरवर्षी शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. आम्ही गणपती उत्सव काळात अनोखा देखावा साकारन्याचा  प्रयत्न करतो. तसेच विसर्जन मिरवणूक जल्लोषात सादर केली जाते. या वर्षी आम्ही विसर्जन मिरवणुकीत मुख्य आकर्षण तांडव नृत्य आयोजित केले होते अशी माहिती शिवसेवा मित्र मंडळ अध्यक्ष नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी दिली आहे.
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या