मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काळजाचा ठोका चुकवणारे 7 सेकंद; नाशकातील या भयानक घटनेचा Video पाहून उडेल थरकाप

काळजाचा ठोका चुकवणारे 7 सेकंद; नाशकातील या भयानक घटनेचा Video पाहून उडेल थरकाप

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की रस्त्यावरुव वाहनांची ये-जा सुरू आहे. इतक्यात अचानक याठिकाणी वीज कोसळते. अगदी क्षणभरात हा प्रकार घडतो

  • Published by:  Kiran Pharate
नाशिक 09 सप्टेंबर : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. यादरम्यान पावसात झाडं पडल्याच्या, पुरात लोकं वाहून गेल्याच्या आणि वीज कोसळतानाच्या अनेक घटनाही समोर येत आहे. नाशिकमधील असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. यात वीज पडतानाचं थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. बापरे! कळव्यात वीज कोसळली, भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की रस्त्यावरुव वाहनांची ये-जा सुरू आहे. इतक्यात अचानक याठिकाणी वीज कोसळते. अगदी क्षणभरात हा प्रकार घडतो. आसपासच्या लोकांना काही समजण्याआधीच अगदी काहीच क्षणात वीज रस्त्यावर कोसळते. हे दृश्य अतिशय भीतीदायक आणि थरकाप उडवणारं आहे. ही घटना नाशिकच्या JMCT कॉलेज परिसरात घडली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही प्रचंड पाऊस पडतोय. या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडालाय. यादरम्यान कळव्यातूनही एक असाच व्हिडिओ गुरुवारी समोर आला होता. गुरुवारी संध्याकाळी कळव्यातील रहिवासी भागात वीज कोसळली होती. वीज कोसळताचे दृश्य कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाले होते. दरम्यान नाशिकमध्येही पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. नाशिकच्या वंजारवाडी येथे घराची भिंत कोसळल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छबु गवारी आणि मंदाबाई गवारी असं मयत पती पत्नीचं नाव आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसात या दाम्प्त्याच्या घराची भिंत कोसळली. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
First published:

Tags: Nashik, Shocking video viral

पुढील बातम्या