Home /News /maharashtra /

Nashik leopard attack: घराच्या आवारात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, पुढे काय घडलं? पाहा थरारक घटनेचा CCTV

Nashik leopard attack: घराच्या आवारात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, पुढे काय घडलं? पाहा थरारक घटनेचा CCTV

घराच्या आवारात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, पुढे काय घडलं? पाहा थरारक घटनेचा LIVE VIDEO

घराच्या आवारात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, पुढे काय घडलं? पाहा थरारक घटनेचा LIVE VIDEO

Nashik leopard attack CCTV: नाशिकमध्ये घराबाहेर बसलेल्या पाळीवर कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 7 जून : घराच्या आवारात बसलेल्या एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला (Leopard attack on dog) केल्याची घटना नाशिक (Nashik)मध्ये घडली आहे. नाशिकच्या मुंगासरे गावात बिबट्याचा मुक्त संचार पहायला मिळत आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर केलेला हल्ला आहे. बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची ही घटना घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Leopard attack on dog, Nashik incident caught in CCTV) नाशिकच्या मुंगसरे गावात ही घटना घडली आहे. शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात पाळीव कुत्रा रात्रीच्या सुमारास बसलेला होता. तितक्यात बिबट्या तेथे आला. यावेळी किशोर उगले यांच्या पाळीव कुत्र्याने त्या बिबट्याला चकवा दिला. मात्र, त्यानंतर बिबट्याने कुत्र्यावर झडप घेतली. बिबट्याने कुत्र्यावर झडप घेतल्यानंतर कुत्र्यानेही या बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र, या हल्ल्यात कुत्र्याचा बळी गेला. गावात शिरुन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा : चुकून एक्सलेटर वाढवला अन् स्कूटीसह तरुणी ATM मध्येच शिरली, नाशकातील घटनेचा LIVE VIDEO 5 जून रोजी रात्री 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. शेतकरी किशोर उगले यांच्या घराच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, एक कुत्रा घराच्या आवारात असलेल्या छोट्या कट्ट्यावर बसलेला आहे. काही सेकंदातच सीसीटीव्हीत बिबट्याही दिसतो. तितक्यात कुत्रा बिबट्याला पाहून चकवा देतो आणि घराच्या आवारात उडी घेतो. त्यानंतर बिबट्या त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करतो. पण कुत्रा त्याला चकवा देत पुन्हा कठड्यावर उडी घेतो. यानंतर बिबट्या कुत्र्यावर झडप घेतो. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून गावात आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या बिबच्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cctv footage, Leopard, Nashik

    पुढील बातम्या