घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. बिबट्याच्या मुक्त वावरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मंदिरासमोर झोपलेल्या नागरिकांना गाडीने चिरडलं, एकाचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO गेल्या वर्षभरात नाशिकमध्ये सहा ते सात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन तीन बालकांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तीन आवड्यापूर्वी नाशिक शहरातील अशोकनगर परिसरात भरवस्तीत बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली होती. तर आताच दोन आठवड्यापूर्वीच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी गावात ही सायंकाळच्या सुमारास अचानक बिबट्याने शाळकरी मुलीवर हल्ला चढवत ठार केले. त्यामुळे या घटना वाढत आहेत. अशात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.या घटनेत गिरणारे गावात घराबाहेर असलेल्या श्वानावर बिबट्याने हल्ला केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. pic.twitter.com/aNA98Jxo2H
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Leopard, Nashik, Shocking video viral