मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /केक घ्यायला गेला अन् पैसे मागितले तर आला राग; फुकट्याने उगारला कोयता, LIVE VIDEO

केक घ्यायला गेला अन् पैसे मागितले तर आला राग; फुकट्याने उगारला कोयता, LIVE VIDEO

कोयता गँगने घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या टवाळाखोरांचा बंदोबस्त करावा तसेच कोयता गॅंग वर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नाशिक, 27 मार्च : सिडको परिसरातील कोयता गॅंगचे लोन सातपूरलाही पसरले आहे. केकचे पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने दुकानाच्या मालकावर थेट कोयता उगारल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोयता उगारून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न यावेळी झाल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातील बेकरीमध्ये केक घेण्यासाठी गेलेल्या टोळक्याने पैसे देण्याच्या कारणातून दुकानदाराशी वाद घातला. बेकरीत आरडाओरड झाल्याचा आवाज आल्याने बेकरीतील कर्मचारी बाहेर आले. त्यानंतर काउंटरवरून बाहेर निघाल्याने टोळक्याने दुकानावर दगडफेक केली. तसेच बेकरीचे मालक असलेले अनिकेत जाधव यांच्यावर थेट कोयता उगारला.

भरधाव कार घुसली रसवंतीगृहात, अकरा वर्षांच्या मुलाचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL 

कोयता गँगने घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी या टवाळाखोरांचा बंदोबस्त करावा तसेच कोयता गॅंग वर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयतांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news