नाशिक, 10 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असलेल्या केंद्रीय राखुव सुरक्षा दलातील जवानाच्या दुचाकीचा अपघात झाला. शिर्डीवरून साईबाबांचे दर्शन घेऊन परत येत असताना ही घटना घडली. यावेळी जवानासोबत पत्नी आणि दोन मुलेही होती. अपघात झाल्यानंतर पत्नी आणि मुलांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र जवान गणेश गिते वाहून गेले आहेत.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात गोदावरी कालव्यात वाहून गेलेल्या जवानाचे नाव गणेश सुखदेव गिते असं आहे. ते पत्नी आणि मुलांसह शिर्डीला गेले होते. घरी परत येत असताना सिन्नर तालुक्यात चोंढी शिवारात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघाताची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांना समजताच ते घटनास्थळी रवाना झाले आहेत.
भयंकर अपघातानंतर 50 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट; जळून राख झाली..भयानक VIDEO
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशेष पथकात ते तैनात असतात. २४ फेब्रुवारी रोजी गणेश गिते हे सुट्टीवर आले आहेत. घराच्या काही मीटर अंतरावर आले असतानाच दुचाकीचा अपघात होऊन ते गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडले. अपघात झाल्याची बाब लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेत गणेश गिते यांच्या पत्नी आणि मुलांना बाहेर काढले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहून गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik