Home /News /maharashtra /

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! ट्रकची दोन वाहनांना धडक, 5 जण ठार

Jalgaon Accident : जळगावात भीषण अपघात! ट्रकची दोन वाहनांना धडक, 5 जण ठार

जळगाव जिल्ह्यात ट्रकने दोन वाहनांना दिलेल्या धडकेमध्ये 5 जण ठार झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

    जळगाव, 29 जून (नितिन नांदूरकर) :  जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहनातून बकर्‍या घेऊन जाणार्‍या वाहनाला भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्‍या ट्रकने उडविले. या अपघातामध्ये 5 जण ठार झाले आहे. जळगाव आणि नशिराबाद येथून बकर्‍या भरून एक एमएच ४३ एडी : १०५१ क्रमांकाचे बोलेरो पीकअप वाहन फैजपूर येथे बाजार असल्याने निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या पुढे असणार्‍या उड्डाणपुलाजवळ समोरून (भुसावळकडून ) भरधाव वेगाने येणार्‍या एमएच ०९ एचजी : ९५२१ क्रमांकाच्या ट्रकने रॉंग साईडला येऊन या वाहनाला जोरदार धडक दिली. यानंतर हीच ट्रक अजून एका वाहनाला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात पाच जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या अपघातानं महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रागा यावेळेस पहावयास मिळाल्यात.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Accident, Jalgaon

    पुढील बातम्या