मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गटात आलबेल नाही? आमदाराने स्वतःच नाराज असल्याचं सांगितल्याने खळबळ

शिंदे गटात आलबेल नाही? आमदाराने स्वतःच नाराज असल्याचं सांगितल्याने खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आता स्वतः सुहास कांदे यांनीच आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Kiran Pharate

नाशिक 12 नोव्हेंबर : राज्यात मागील काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 अशा 50 आमदारांनी महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं खरं मात्र यातही काही नेते नाराज असल्याच्या बातम्या समोर येत राहतात. आता अशीच आणखी एक बातमी समोर आली आहे.

आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेला, मध्य प्रदेश सरकारने मिळवला!

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आता स्वतः सुहास कांदे यांनीच आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं आहे. नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या पदाधिकारी नियुक्तीवरून शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

याशिवाय मला कोणत्याही प्रशासकीय बैठकांना बोलावलं जात नाही. मला दूर ठेवलं जातं, असं सांगत सुहास कांदे यांनी नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आपण केवळ एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रेमापोटी त्यांच्यासोबत आहोत, असंही सुहास कांदे यांनी स्पष्ट केलं आहे.

सेनेला रोखण्यासाठी केसरकर-राणे आले एकत्र, सिंधुदुर्गात 'या' निवडणुकीत दिली विजयी सलामी

गेल्या दीड दोन महिन्यांपासून आमदार सुहास कांदे हे कोणत्याही कार्यक्रम, अथवा बैठकांना दिसत नसल्याबाबत दादा भुसेंना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर दादा भुसेंनी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, कोणताही चुकीचा अर्थ लावू नका. आम्ही एक दिलाने काम करीत आहोत, असंही ते म्हणाले होते. मात्र, आता सुहास कांदे यांच्या या विधानानंतर नाशिकमध्ये शिंदे गटात नाराजीचे वारे वाहात असल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाच्या बैठकांना का बोलावलं जात नाही? हे भुसेंना विचारावं, असं कांदे म्हणाले आहेत.

First published:

Tags: Eknath Shinde, Maharashtra political news