मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Khamkar Sisters: पहिल्या 'राष्ट्रीय ग्रेपलिंग रेसलिंग' स्पर्धेत नाशिकच्या बहिणींनी गाजवलं मैदान; मोठीला चांदीची गदा तर धाकटीला रौप्य पदक

Khamkar Sisters: पहिल्या 'राष्ट्रीय ग्रेपलिंग रेसलिंग' स्पर्धेत नाशिकच्या बहिणींनी गाजवलं मैदान; मोठीला चांदीची गदा तर धाकटीला रौप्य पदक

भगूर येथे पार पडलेल्या पहिल्या 'इंडियन ओपन ग्रेपलिंग रेसलिंग चॅम्पियनशिप-2021' ('Indian Open Grappling Wrestling Championship-2021) स्पर्धेत नाशिकच्या सिन्नर येथील दोन सख्ख्या बहिणींनी कमाल कामगिरी केली आहे.

  • Published by:  News18 Desk

सिन्नर, 28 डिसेंबर: भगूर येथे पार पडलेल्या पहिल्या 'इंडियन ओपन ग्रेपलिंग रेसलिंग चॅम्पियनशिप-2021' ('Indian Open Grappling Wrestling Championship-2021) स्पर्धेत नाशिकच्या (nashik) सिन्नर (Sinnar) येथील दोन सख्ख्या बहिणींनी कमाल कामगिरी केली आहे. या स्पर्धेत मोठी बहीण आकांक्षा कृष्णाजी खामकर (Akanksha Krushnaji Khamkar) हिने 72 किलो वजनी गटात सुवर्ण पदक (Gold medal) आणि चांदीची गदा (Silver mace) पटकावत 'भारत ग्रेपलर श्री' हा मान मिळवला आहे. तर धाकटी बहीण कावेरी (Kaveri khamkar) हिने देखील 62 किलो वजनी गटात रौप्य पदक (Silver medal) पटकावून नाशिककरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

तर पुरुष गटात 92 किलो वजनी गटात हरियाणाच्या राहुल राणाने 'भारत ग्रेपलर श्री'चा बहुमान मिळवला आहे. खरंतर, महाराष्ट्राच्या वतीने बलकवडे येथील व्यायाम शाळेत 24 ते 26 डिसेंबर दरम्यान 'इंडियन ओपन ग्रेपलिंग रेसलिंग चॅम्पियनशिप-2021' ही पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील 200 हून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आदी राज्यातील कुस्तीपटूंचा समावेश होता.

याने तर कहरच केला! T20 लीगच्या इतिहासात 4 ओव्हरमध्ये दिले सर्वाधिक रन

या अटीतटीच्या स्पर्धेत नाशिकजवळील सिन्नर येथील आकांक्षा आणि कावेरीनं मैदान गाजवलं आहे. या स्पर्धेत आकांक्षाने 72 किलो वजनी गटात पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंना चारीमुंड्या चित करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर कावेरी हिने देखील उत्कृष्ठ कामगिरी करत रौप्य पदाला गवसनी घातली आहे. त्यांच्या या यशाने नाशिककर हुरळून गेले असून अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बाप दिग्गज फास्ट बॉलर, पोरगा बनला T20 स्टार, ठोकलं वादळी शतक!

आकांक्षा आणि कावेरी या सिन्नर येथील होरायझन अकॅडमी स्कूलच्या विद्यार्थिनी असून त्या अनुक्रमे दहावी आणि आठवीत शिकत आहेत. आकांक्षाने दोन वर्षांपूर्वी तालुका, जिल्हा आणि विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत आपलं नाव केलं होतं. तर राज्यस्तरीय स्पर्धेत तिने तृतीय क्रमांक पटकावला होता. कावेरीनं देखील विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. या यशानंतर दोन्ही बहिणींनी मागे वळून पाहिलं नाही, कठोर मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यांनी यावर्षी पार पडलेल्या 'इंडियन ओपन ग्रेपलिंग रेसलिंग चॅम्पियनशिप-2021' स्पर्धेत मोठं यश मिळवलं आहे.

First published:

Tags: Nashik, Sport, Wrestler