मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : मुलांना आंघोळ घालताना काळजी घ्या! अंगावर गरम पाणी पडून 10 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

Nashik : मुलांना आंघोळ घालताना काळजी घ्या! अंगावर गरम पाणी पडून 10 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नाशिक, 17 नोव्हेंबर : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढून ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने अवघ्या दहा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. नाशिकच्या गंगापूर नाका भागात घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आवेरा शुभम इंगळे असे मृत बलिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आंघोळीसाठी तापवलेले पाणी अंगावर पडल्याने 10 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना जुना गंगापूर नाका येथील राठी आमराई परिसरात घडली. आवेरा शुभम इंगळे असे या चिमुकलीचे नाव आहे. आवेराच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती गंभीर रित्या भाजली होती तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे ही वाचा : घरातील पाण्याच्या बिलामुळेच आला आफताबवर संशय अन् बारमध्ये जाताच भांडाफोड, श्रद्धा हत्याकांडाचा असा झाला खुलासा

जुना गंगापूर नाका परिसरातील राठी आमराई भागात असलेल्या श्री साई अपार्टमेंटमध्ये इंगळे कुटुंबीय राहतात. शनिवारी रात्री आवेरा हिच्या आंघोळीसाठी गरम पाणी भांड्यात काढण्यात आले. मात्र, पाण्यास आवेराचा धक्का लागून गरम पाणी तिच्या अंगावर सांडले. त्यात ती गंभीररीत्या भाजल्याने आवेराला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आवेराचा मंगळवारी (दि.15) रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगावमध्ये एकाला सक्तमजुरी

जळगावलगतच्या एका गावात ही मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. घड्याळ देण्याच्या बहाण्याने मुलीला मनोज सोनवणे (२७, रा. ममुराबाद, ता. जि. जळगाव) याने १७ जुलै २०१७ रोजी दुपारी घरात बोलावून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात मनोज सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

हे ही वाचा : पुण्यातील कोथरुडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट, 7 वा आणि 8 वा मजला आगीच्या भक्षस्थानी

हा खटला पोक्सो न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यात सरकारपक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित व तिच्या आईची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी म्हणून विजय पाटील यांनी सहकार्य केले.

First published:

Tags: Crime, Fire, Nashik