मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Brave Lady Gauri Mahadik : मेजर पती शहीद; पतीचं अपुरं राहिलेलं स्वप्न वीरपत्नी करतेय पूर्ण

Brave Lady Gauri Mahadik : मेजर पती शहीद; पतीचं अपुरं राहिलेलं स्वप्न वीरपत्नी करतेय पूर्ण

file photo

file photo

भारत-चीन सीमेवरील ‘आसाम हिल’ येथे टॅन्क तपासणी करताना स्फोट झाला होता. या स्फोटात मेजर प्रसाद महाडिक यांना वीरमरण आले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Khushalkant Dusane

नाशिक, 2 नोव्हेंबर : भारतीय सैन्यदलातील अनेक वीर जवानांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. भारतीय सेनेच्या बिहार रेजिमेंटच्या 7व्या बटालियनचे मेजर प्रसाद महाडिक हेसुद्धा कर्तव्य बजावताना शहीद झाले होते. यानंतर त्यांच्या पत्नी गौरी महाडिक यांनी आपले पती शहीद झाल्यानंतर भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला होता.

वीरपत्नी गौरी महाडिक यांनी सैन्यात भरती होऊन शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस व्यक्त केला होता. यानंतर त्या 2020 मध्ये भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या होत्या. आता त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून आता त्या भारतीय सैन्यदलात पायलट झाल्या आहेत.

मागील वर्षभरापासून गौरी महाडिक यांनी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅट्स) आधुनिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम प्रणालीअंतर्गत उड्डाणाचे धडे घेतले. सध्या त्या कॅप्टन पदावर असून त्यांना गुरुवारी समारंभपूर्वक विंग्स प्रदान करून गौरविण्यात आले.

भारत-चीन सीमेवरील ‘आसाम हिल’ येथे टॅन्क तपासणी करताना स्फोट झाला होता. या स्फोटात मेजर प्रसाद महाडिक यांना वीरमरण आले होते. त्यांचे पती शहीद मेजर प्रसाद महाडिक यांनी ज्या ठिकाणाहून प्रशिक्षण घेतले होते त्याच ठिकाणाहून त्यांनी चेन्नईच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले.

हेही वाचा - गड्याचा नादच खुळा! NDA साठी सोडले IIT वर पाणी; मी नापास झाल्याचं सांगितलं अन्...

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये त्यांनी बेसिक रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीमचे यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना गुरुवारी दीक्षांत सोहळ्यात ‘आरपीएएएस विंग’ प्रदान करून गौरविण्यात आले. ड्रोन तसेच मानवविरहित लहान एअरक्राफ्टद्वारे सीमेवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. कॅट्समधून प्रथमच मागील वर्षभरापासून या ‘आरपीएएस’ प्रणालीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.

यावर्षी हा अभ्यासक्रम 18 अधिकाऱ्यांनी पूर्ण केला. यामध्ये कॅफ्टन गौरी महाडिक यांच्यासह अन्य दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मार्च 2020 साली त्या लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाल्या. आता त्यांनी पायलट होण्यासाठीचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.

First published:

Tags: Indian army