मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sita Gufa : श्रीरामांनी वास्तव्य केलेलं नाशिकमधील ठिकाण, तुम्हाला माहिती आहे का इतिहास? पाहा VIDEO

Sita Gufa : श्रीरामांनी वास्तव्य केलेलं नाशिकमधील ठिकाण, तुम्हाला माहिती आहे का इतिहास? पाहा VIDEO

नाशिकच्या पंचवटी परिसरात गोदावरी काठी श्री काळाराम मंदिराच्या (Kalaram Temple) बाजूला अगदी काही अंतरावर ही प्राचीन ( Sita Gunfa ) सीता गुंफा आहे.

नाशिक 8 ऑगस्ट : नाशिक शहराची ( Nashik City ) ओळख ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी म्हणून तर आहेच. मात्र, पर्यटन नगरी म्हणूनही नाशिक शहराची  ओळख आहे. नाशिक शहर हे ऐतिहासिक ठेवा जपणारं शहर आहे. शेकडो वर्षांचा वारसा हा नाशिक शहराला लाभलेला आहे. त्यामुळे साहजिकच जगाच्या नकाशावर नाशिकला वेगळे महत्व आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक ( Historical ) वास्तू आहेत. त्यापैकी एक विशेष प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सीता गुंफा. ( Sita Gufa In Nashik City ) नाशिकच्या पंचवटी परिसरात गोदावरी काठी श्री काळाराम मंदिराच्या (Kalaram Temple) बाजूला अगदी काही अंतरावर ही प्राचीन सीता गुंफा आहे. या ठिकाणी पाच महाकाय शेकडो वर्षांची जुनी वडाची झाड आहेत. असे म्हटले जाते की, याच वडाच्या झाडांखाली सीतेचा संसार होता आणि बाजूला प्राचीन गुंफा आहे. गुंफा पूर्णतः दगडात कोरलेली आहे. फक्त एकच व्यक्ती एकावेळी या ठिकाणी आत प्रवेश करू शकतो. तोही बसून उभा राहून नाही. सात -आठ फूट खाली जाऊन तुम्हाला पुढे जावं लागत आणि त्यानंतर श्रीराम, सीताआणि लक्ष्मण यांचं प्रतिकात्मक दर्शन होत.

हेही वाचा- शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी खास स्पर्धा; 50 हजार रूपये जिंकण्याची संधी! VIDEO

या ठिकाणी आहे महादेवाची पिंड दुसऱ्या गुंफेत गेल्यानंतर भगवान शंकरांच दर्शन होत. या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. सीता याच ठिकाणी भगवान शंकराची उपासना करायची म्हणजे जवळपास 50 फुटांची लांब ही गुंफा आहे. दररोज हजारो भाविक या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतात. याच परिसरातून रावणाने सीतेच अपहरण केलं होत, असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. सीता गुंफेच हे आहे रहस्य इतिहास अभ्यासक नरेंद्र धारणे सांगतात की, याच गुंफेतून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ल्यावर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. श्रीराम याच मार्गाचा वापर करत असल्याचं सांगतात. पुढे बोलताना ते म्हणतात की, रामशेज किल्ल्यावर देखील काही काळ श्रीरामांनी वास्तव्य केलं होत. त्यामुळे या भुयारी मार्गाचा तेव्हा वापर केला जात असावा. मात्र, गुंफेतून ही जागा सुरक्षेच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून बंद केलेली आहे. हे खर आहे की खोटं याची पडताळणी देखील झालेली नाही.

गुगल मॅप वरून साभार

सीता गुंफेपर्यंत कसे पोहचाल ? नाशिक शहरातील बसस्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर पंचवटीमध्ये सीता गुंफा आहे. बस किंवा रिक्षाने तुम्ही जाऊ शकता तसेच नाशिक रेल्वे स्टेशनपासून 11 किलोमीटर तर नाशिक विमातळा पासून 19 किलोमीटरवर सीता गुंफा आहे. सीतागुंफाला भेट देण्यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल 168 किलोमीटर अंतर आहे. पुण्यावरून येत असालतर 243 किलोमीटर अंतर आहे. हेही वाचा- Pune: यंदा राखी बांधा आणि नंतर खा! भावासाठी घेऊन या Chocolate Rakhi, Video सीता गुंफा बघण्याची वेळ ? सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही कधीही मोफत बघू शकता. दर्शन घेऊ शकता मात्र रात्री 9 नंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. कारण मध्ये संपूर्णतः अंधार असतो त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेतली जाते.
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या