मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik: पोलिसांनीच हेल्मेट भेट द्यावं! वाचा, नाशिककरांनी का केली मागणी?

Nashik: पोलिसांनीच हेल्मेट भेट द्यावं! वाचा, नाशिककरांनी का केली मागणी?

वाहतूक पोलिसांनीच आम्हाला हेल्मेट घेऊन द्यावं, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

वाहतूक पोलिसांनीच आम्हाला हेल्मेट घेऊन द्यावं, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

वाहतूक पोलिसांनीच आम्हाला हेल्मेट घेऊन द्यावं, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Onkar Danke

नाशिक 29 नोव्हेंबर :  नाशिकमध्ये पुन्हा एकदा दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. 1 डिसेंबर 2022 पासून ही मोहीम शहरात अधिक तीव्र करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात दुचाकीच्या झालेल्या अपघातात हेल्मेट न घातल्याने 83 चालकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर, जवळपास 261 जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट महत्वाचे असताना देखील दुचाकी चालक दुर्लक्ष करत असल्यामुळे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरवले आहे.

1 डिसेंबर पासून दुचाकी चालकाने हेल्मेट न घातल्यास कारवाई करण्यात येईल, 500 रुपये दंड ठोठावला जाईल.यामध्ये कोणाला ही सवलत दिली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस कारवाईला ठाम असतानाच त्याचे पडसाद उमटत आहेत. पोलिसांनीच हेल्मेट भेट द्यावं अशी मागणी केली आहे.

हेल्मेट घाला, अन्यथा...

तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नाशिककरांची सुरक्षा लक्षात घेता हेल्मेट सक्ती ही मोहीम अधिक तीव्र प्रमाणात अमलात आणली होती.याकरिता त्यांना अनेक वेळा विविध संघटनांचा विरोध देखील झाला होता.मात्र विरोध झुगारत त्यांनी अनोखे उपक्रम राबवून हेल्मेट सक्ती मोहिमेला बळ दिलं होत, ' नो हेल्मेट,नो पेट्रोल " ही मोहीम त्यांची राज्यभरात चांगलीच गाजली होती.

Nashik : महापालिका देणार महिलांना मोफत रोजगार प्रशिक्षण, 'या' पद्धतीनं करा अर्ज

पेट्रोल पंप चालकांना विश्वासात घेत त्यांनी, जे दुचाकी चालक हेल्मेट घालणार नाहीत त्यांना पेट्रोल देण्यास नकार देण्याची सूचना करण्यात आली होती. या मोहिमेचा देखील चांगला प्रभाव दुचाकी चालकांवर पडला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनी शासकीय कार्यालय तसेच महत्वाच्या ठिकाणी देखील ' नो हेल्मेट, नो सहकार्य ' ही मोहीम राबवली होती.

ही मोहीम सुरू असताना  जवळपास 75 टक्के नाशिककर घरातून बाहेर पडताना दुचाकीवर हेल्मेट वापरत होते, असा दावा पोलिसांनी केलाय. त्याचबरोबर या काळात दुचाकीच्या अपघातामध्येही अनेक जण वाचले असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेल्मेट सक्तीवर आक्षेप

'हेल्मेट सक्ती ही प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेच. मात्र दंडाची असलेली अवाढव्य रक्कम ही सर्व सामान्य माणसाला परवडणारी नाही. सर्व सामान्य कंपनीत काम करणाऱ्या माणसाला 200 रुपये रोजचा पगार असतो. हे पैसे कमावण्यासाठी त्यांना दिवसभर जिवाचं रान करावं लागतं.

पोलिसांनी त्याच्याकडून 500 रुपये दंड स्वरूपात रक्कम वसूल केली तर त्या माणसाने काय करायचं ? हा देखील प्रश्न आहे. पोलिसांनी 500 रुपयांच्या दंडाच्या रकमेतून त्या दुचाकी चालकाला एक हेल्मेट घेऊन दिलं,आणि त्याच हेल्मेटच त्याला महत्व पटवून दिलं तर नक्कीच तो हेल्मेट घालेल,असा उपक्रम राबविणे गरजेचे आहे.हेल्मेट सक्ती मोहीम अनेक वेळा राबवली, पण त्यातून फक्त सर्व सामान्य माणसाची दमणूक झाली. त्यालाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागला अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक लखन कुमावत यांनी दिली आहे.

कॉलेजातल्या आदिवासी मुलानं बांबूपासून बनवल्या आकर्षक वस्तू, पाहा Video

हेल्मेट नसल्यानं झालेल्या अपघातापेक्षा जास्त अपघात  शहरातील खड्डे,अतिक्रमण, वाहतूक व्यवस्थेचं अयोग्य नियोजन यामुळे होतात. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांची ही जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया आणखी एक नाशिककर दत्तू बोडके यांनी दिली आहे.

First published:

Tags: Local18, Nashik