मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस; 7 भाविक जखमी, Video पाहून हादराल!

नाशिकच्या सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस; 7 भाविक जखमी, Video पाहून हादराल!

पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नाशिक, 11 जुलै : सध्या राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिकमध्येही तुफान पाऊस सुरू आहे. नाशिकच्या (heavy to heavy rain on Saptashrungi fort in Nashik) सप्तशृंगी गड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असल्याचा एका व्हिडीओदेखील समोर आला आहे. मंदिराच्या वरच्या बाजूने डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे पायऱ्यांवरुन धबधबा वाहत असल्या सारखा दिसत आहे. सप्तशृंगी मंदिर येथून खाली पायऱ्यांवरून पाण्यासोबतच चिखल-दगड वाहून येत असल्याने काही भाविकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. या सर्वात सात भाविक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मंदिराच्या पायऱ्यांवरुन धो धो वाहणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्येही भीती पसरली आहे. सप्तशृंगी गड येथील प्रदक्षिणा मार्ग देखील खचला आहे. प्रशासनाचे विशेष पथक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गडावर दाखल झाले आहेत. राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Monsoon rain update) आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत.
First published:

Tags: Nashik, Rain flood

पुढील बातम्या