मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस; काका, पुतणीसह तीन जण गेले वाहून

Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस; काका, पुतणीसह तीन जण गेले वाहून

राज्यात इतर ठिकाणांप्रमाणेच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे नाशिकमध्ये आलेल्या पुरात काका पुतणीसह तीन जण वाहून गेले आहेत.

राज्यात इतर ठिकाणांप्रमाणेच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे नाशिकमध्ये आलेल्या पुरात काका पुतणीसह तीन जण वाहून गेले आहेत.

राज्यात इतर ठिकाणांप्रमाणेच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे नाशिकमध्ये आलेल्या पुरात काका पुतणीसह तीन जण वाहून गेले आहेत.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी  नाशिक, 12 जुलै : राज्यात सध्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. (Heavy Rain in Maharashtra) या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे. तर पावसामुळे अनेक जणांचा मृत्यू (Death in Rain Maharashtra) झाला आहे. या मुसळधार पावसात वीज कोसळून काही ठिकाणी जनावरांचाही मृत्यू (Animals death due to lightning) झाला आहे. यातच आता नाशिकमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे घटना - राज्यात इतर ठिकाणांप्रमाणेच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे नाशिकमध्ये आलेल्या पुरात काका पुतणीसह तीन जण वाहून गेले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. दिंडोरी तालुक्यातील कोचरगावमध्ये हे काका आणि पुतणी नदी पार करत होते. यात काका आणि 6 वर्षाची मुलगी वाहून गेल्याची घटना घडली. स्थानिकांना यात काकाला वाचवण्यात यश आले आहे. तर मुलगी बेपत्ता आहे. तसेच त्र्यंबक येथील तळेगावमध्ये 34 वर्षीय व्यक्ती किकवी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा - Live Updates : पुण्यात दुकानाची भिंत कोसळली, एका जण जखमी नाशिकच्या सप्तशृंगी गडावर ढगफुटी सदृश्य पाऊस - राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नाशिकमध्येही तुफान पाऊस सुरू आहे. नाशिकच्या (heavy to heavy rain on Saptashrungi fort in Nashik) सप्तशृंगी गड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मंदिराच्या वरच्या बाजूने डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे पायऱ्यांवरुन धबधबा वाहत होता. सप्तशृंगी मंदिर येथून खाली पायऱ्यांवरून पाण्यासोबतच चिखल-दगड वाहून येत असल्याने काही भाविकांना याचा फटका सहन करावा लागला. तर या सर्वात सात भाविक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मंदिराच्या पायऱ्यांवरुन धो धो वाहणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्येही भीती पसरली आहे. सप्तशृंगी गड येथील प्रदक्षिणा मार्ग देखील खचला आहे. प्रशासनाचे विशेष पथक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गडावर दाखल झाले आहेत. पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nashik, Rain

    पुढील बातम्या