नाशिक, 5 मार्च : राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका जाणवत आहे. त्यात शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. यातच आता नाशकात पुन्हा शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. नाशकात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मालेगाव, सटाणा भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. तर कळवणच्या अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरबऱ्यासह आंबा मोहराला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.
ढगाळ हवामानाचा धोका! शेतकऱ्यांनो 'या' पद्धतीनं घ्या पिकांची काळजी
चारा महागल्याने शेतकरी संकटात -
जालना जिल्ह्यातील पशुपालकांना वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे. एवढे दिवस लंपी या जनावरांना होणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे पशुपालक आधीच अडचणीत आहेत. त्यातच आता चारा टंचाईचे नवे संकट निर्माण झाले आहे. मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे ज्वारी पिकाची पेरणी कमी झाली आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी गहू पिकाचा पेरा वाढवला आहे. यामुळे चाऱ्याची समस्या निर्माण झाली असून दरात दुप्पट वाढ झाली आहे.
मागील वर्षी कडब्याची एक पेढी साधारणतः 20 ते 22 रुपयांना मिळायची तिचे यंदाचे दर 35 ते 40 रुपये एवढे आहेत. यामुळे दुग्धव्यवसाय करणारे व्यवसायिक देखील अडचणीत आले आहेत. 100 ते 150 रुपये शेकडा मिळणारे वाढे देखील यंदा 250 ते 300 रुपये शेकडा या प्रमाणे मिळत आहेतं. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Rain, Rain updates, Todays Weather, Weather, Weather Forecast, Weather Update