मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशकात मुख्याध्यापकानं चावला शिक्षकाचा अंगठा, कारण वाचून लावाल डोक्याला हात

नाशकात मुख्याध्यापकानं चावला शिक्षकाचा अंगठा, कारण वाचून लावाल डोक्याला हात

Crime in Nashik: नाशिक जिल्ह्यातील येवला याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका शाळेतील मुख्याध्यापकानं संबंधित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाचा अंगठा चावला आहे.

Crime in Nashik: नाशिक जिल्ह्यातील येवला याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका शाळेतील मुख्याध्यापकानं संबंधित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाचा अंगठा चावला आहे.

Crime in Nashik: नाशिक जिल्ह्यातील येवला याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका शाळेतील मुख्याध्यापकानं संबंधित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाचा अंगठा चावला आहे.

नाशिक, 14 जानेवारी: नाशिक जिल्ह्यातील येवला याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका शाळेतील मुख्याध्यापकानं संबंधित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाचा अंगठा चावला आहे. या घटनेत संबंधित शिक्षकाचा अंगठ्याला मोठी दुखापत झाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित शिक्षकानं येवला पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना उघडकीस येताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सुरेश एस अहिरे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी अहिरे हा येवला तालुक्यातील नगरसूल येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तर ब्रम्हचैतन्य जालिंदर राजगुरू असं फिर्यादी शिक्षकाचं नाव आहे. फिर्यादी राजगुरू हे संबंधित शाळेत उपशिक्षक आहेत. आरोपी अहिरे हा विविध कारणं सांगून फिर्यादीकडून पैसे घेत होता. अलीकडेच शाळेच्या कॅटलॉगमध्ये झालेल्या चुका माफ करण्यासाठी आरोपी अहिरे यानं फिर्यादीकडे जेवणाची मागणी केली होती.

हेही वाचा- पुण्यातील बड्या बिल्डरला अजितदादांच्या पीएच्या नावानं धमकीचा फोन, मागितले 20 लाख

पण फिर्यादीच्या पगारातून मोठी रक्कम कर्जाचा हफ्ता देण्यासाठी जात होती. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहात नसायचे, अशात मुख्याध्यापकाकडून विविध कारणं देऊन पैशांची मागणी केली जात होती. तसेच आरोपीकडून सतत धमकी दिली जात होती, असंही फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा-आजीसोबत देवदर्शनासाठी जाणाऱ्या चिमुकल्याचा वाटेतच संपला प्रवास, तडफडून मृत्यू

घटनेच्या दिवशी 12 जानेवारी रोजी आरोपी अहिरे यानं फिर्यादीला कॅटलॉग घेऊन येवला शहरातील पंचायत समिती परिसरात बोलावलं होतं. याठिकाणी फिर्यादी राजगुरू गेले असता, मुख्याध्याप अहिरे हा आपल्या अन्य एका मित्रासोबत मद्यधुंद अवस्थेत होता. यावेळी आरोपीनं कॅटलॉग पाहिल्यानंतर, त्यामध्ये भरपूर चुका असल्याचं सांगितलं. संबंधित चुका माफ करून घ्यायच्या असतील, तर आम्हाला जेवण सांग अशी मागणी आरोपीनं केली.

हेही वाचा-नातेवाईकाचे हातपाय बांधून विवाहितेवर गँगरेप, जंगलात नेऊन गाठला विकृतीचा कळस

पण फिर्यादीकडे पैसे नसल्याल्याचं त्यांनी आरोपी मुख्याध्यापकाला सांगितलं. यावेळी चिडलेल्या मुख्याध्यापकानं रागाच्या भरात फिर्यादीचा डाव्या हाताच्या अंगठ्याला जबरदस्त चावा घेतला आहे. हा हल्ला इतका भयावह होता की, यामध्ये फिर्यादी शिक्षक राजगुरू यांचा अंगठा रक्तबंबाळ झाला. या धक्कादायक प्रकारानंतर राजगुरू यांनी येवला पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Nashik