विठ्ठल भाडमुखे प्रतिनिधी
नाशिक, 17 मार्च : गुढीपाडवा जवळ आला आहे त्यामुळे सध्या सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. यामुळे नाशिकच्या बाजारपेठेत विविध प्रकारच्या रेडिमेड गुढी विक्रीसाठी आलेल्या आहेत. या गुढींना सध्या बाजारात चांगली मागणी मिळत आहे.
आकर्षक गुढी
गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरावर उभारलेली गुढी ही आकर्षक कशी दिसेल याचा विचार करत असतो. त्यामुळे विक्रेत्या शितल मोरे यांनी नऊवारी साडीपासून विविध प्रकारच्या आकर्षक अशा गुढी तयार केल्या आहेत. त्यांच्या या गुढींना सध्या बाजारात चांगली मागणी मिळत आहे. शीतल या गेल्या अनेक दिवसांपासून शिवणकाम करत आहेत. त्यामुळे त्यांनी ग्राहकांचा कल लक्षात घेता नऊवारी साडीपासून गुढी तयार केल्या आहेत.
या पॅटर्नला अधिक मागणी
शितल मोरे यांनी ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता गुढी तयार केल्या आहेत. सध्या ग्राहकांचा कल हा शाही मस्तानी आणि राजलक्ष्मी पॅटर्नकडे अधिक आहे. त्यामुळे त्यांनी अशा गुढी तयार केल्या आहेत. यासोबतच भरजरी गुढी, सिल्क गुढी, स्पेशल गुढी प्रकारच्या गुढींही त्याच्याकडे आहेत. या गुढींची किंमत 250 रुपयांपासून पुढे आहे,असं विक्रेत्या शितल मोरे यांनी सांगितलं.
गुढी तयार करून मिळेल
आपल्याकडे एखादी थीम असेल आणि त्याच थीमनुसार आपल्याला गुढी तयार करायची असेल तर अशा गुढी देखील तुम्हाला तयार करून मिळतील. नऊवारी साडी तसेच इतर अनेक कपड्यांपासून गुढी तयार केल्या जातात, असंही शितल यांनी सांगितलं.
कुठे मिळतील या आकर्षक गुढी?
नाशिक शहरातील शिवाजीनगर जेलरोड परिसरातील दिनेश टेलरिंग अँड मॅचींग सेंटर येथे या आकर्षक गुढी तुम्हाला मिळतील.
गूगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gudi Padwa 2023, Lifestyle, Local18, Nashik, Shopping