मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मालेगावात टोळक्याचा 2 तरुणांवर तलवारीने जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद, VIDEO विचलित करणारा

मालेगावात टोळक्याचा 2 तरुणांवर तलवारीने जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद, VIDEO विचलित करणारा

तलवारीने 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मालेगावच्या पवारवाडी भागात घडली आहे (Goons Attacked on Man With Sword). ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नाशिक 11 जुलै : मालेगावमधून गुंडाच्या टोळीच्या धुमाकूळाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात हातात नंग्या तलवारी घेऊन गुंडाच्या टोळक्याने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतं. तलवारीने 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मालेगावच्या पवारवाडी भागात घडली आहे (Goons Attacked on Man With Sword). ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुप्तांगात पेट्रोल ओतून प्लास्टिक पाईपने घरमालकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण; संतापजनक कारण समोर या हल्ल्यात एका तरुणाचा पाय तुटला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. टोळक्याने हल्ला केल्यानंतर दोन्ही तरुण जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावताना दिसतात. मात्र, गुंडांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. मात्र, घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुंडांचा तपास सुरू केला आहे. कधी गोळीबार, कधी टोळी युद्ध, अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली असल्यामुळे मालेगावात चाललंय तरी काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे नागरिकांकडून गुंडगिरी मोडून काढण्याची मागणी केली जात आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक टोळकं रस्त्यावर तरुणांचा पाठलाग करत आहे. या सर्वांच्या हातामध्ये तलवारी आहेत. तर हे दोन तरुण जीव वाचवण्यासाठी पुढे पळत आहेत. यातील एक तरुण पळ काढतो आणि या गुंडाच्या तावडीतून वाचतो. मात्र, दुसऱ्या तरुणाचा पाय घसरतो आणि तो खाली कोसळतो. यानंतर टोळक्याने या तरुणावर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे.
First published:

Tags: Crime news, Shocking video viral

पुढील बातम्या