विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी
नाशिक, 7 मार्च : सोने चांदीची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी 24 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर 56 हजार 580 होता. आज तेच दर 56 हजार 380 रुपयांवर आले आहेत. म्हणजे साधारण तोळ्यामागे 200 रुपये कमी झाले आहेत. तर काल 22 कॅरेट प्रती तोळा सोन्याचा दर हा 51 हजार 880 रुपये होता, आज तोच दर 51 हजार 680 रुपयांवर आला आहे. म्हणजे तोळ्यामागे जवळपास 200 रुपयेच कमी झाले आहेत. त्यामुळे सोन्याचे दागिने घेण्यासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे.
आजचे दर
सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 56,380
10 ग्रॅम 22 कॅरेट- 51,680
सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,638
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,168
कालचे दर
सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 56,580
10 ग्रॅम 22 कॅरेट- 51,880
सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,658
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,188
चांदीच्या दरात घसरण
चांदीचे दर काल 64 हजार 730 रुपये किलो होते,आज दर 64 हजार 270 रुपयांवर आले आहेत,म्हणजे साधारण किलो मागे 460 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचे दागिने घेण्यासाठी आजचा चांगला दिवस आहे.
चांदीचे आजचे दर
64 हजार 270 रुपये किलो
चांदीचे कालचे दर
64 हजार 730 रुपये किलो
चांदीच्या दरात किलोमागे 460 रुपयांनी घट झाली आहे.
Gold-Silver Rate Today in Pune : धुळवडीच्या दिवशी स्वस्त झालं सोनं! लगेच चेक करा आजचे दर
पुढील काळात सोने चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता
अंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थीरता लक्षात घेता,पुढील काळात सोने,चांदीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.कारण सोने चांदी मध्ये अनेक जण गुंतवणूक करत असतात.दागिन्यांना चांगली पसंती असते,त्यामुळे पुढील काळात भाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nashik