मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Breaking : माजी मंत्री माणिकराव गावित यांचं निधन

Breaking : माजी मंत्री माणिकराव गावित यांचं निधन

तब्बल आठ वेळा खासदर म्हणून निवडून गेले होते ससदेत.

तब्बल आठ वेळा खासदर म्हणून निवडून गेले होते ससदेत.

तब्बल आठ वेळा खासदर म्हणून निवडून गेले होते ससदेत.

  • Published by:  Kranti Kanetkar
नाशिक : राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी बातमी आहे. तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं आहे. उद्या नवापूर इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नाशिकधील खासगी रुग्णाल्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच राजकीय नेत्यांनी ट्वीट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. माणिकराव गावित यांनी देशाचं माजी गृहराज्य मंत्रिपदही भूषवलं होतं. तब्बल ८ वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदार, दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री, लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवलं होतं. त्यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार ,तर मुलगा भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.
First published:

पुढील बातम्या