मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /No Vehicle Day : 'या' महापालिकेचे कर्मचारी एक दिवस देणार वाहनांना सुट्टी

No Vehicle Day : 'या' महापालिकेचे कर्मचारी एक दिवस देणार वाहनांना सुट्टी

No Vehicle Day : या महापालिकेचे कर्मचारी एक दिवस वाहनांना सुट्टी देणार आहेत.

No Vehicle Day : या महापालिकेचे कर्मचारी एक दिवस वाहनांना सुट्टी देणार आहेत.

No Vehicle Day : या महापालिकेचे कर्मचारी एक दिवस वाहनांना सुट्टी देणार आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Nashik [Nasik], India

  विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी

  नाशिक, 03 फेब्रुवारी : सध्या सर्वत्र वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषणासह वायू प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, हे कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे याचा विचार करून तसेच आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता मालेगाव महानगरपालिकेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी 'नो व्हेईकल डे' म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी कोणीही वाहनाचा वापर करणार नाही. सायकल किंवा पायी सर्व कर्मचारी महानगरपालिकेच्या कार्यालयात येतील. मनपाचे प्रशासक भालचंद्र गोसावी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.

  काटेकोरपणे अंमलबजावणी होणार

  केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मालेगाव महानगरपालिकेने विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून शहराला प्रदूषण मुक्तीच्या दिशेने नेण्यासाठी विना वाहन दिवस ही संकल्पना राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महिन्याच्या पहिल्या बुधवारी  महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये या सूचनेचे पालन केले जाणार असल्याची प्रतिक्रिया प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी दिली आहे.

  या उपक्रमात सहभागी व्हावे 

  मालेगाव महानगरपालिकेच्या या उपक्रमात नागरिकांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी कुठल्याही वाहनाचा वापर करू नये, सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा. सायकल वापरल्याने आपल्या शरीरातील मधुमेह, फुफ्फुसाचा आजार, ब्लडप्रेशर वजन वाढणे, या आजारांपासून देखील आपण दूर राहू शकतो आणि शरीराचा देखील व्यायाम होऊ शकतो. शिवाय प्रदूषण मुक्तीसाठी देखील हे पाऊल परिणामकारक ठरेल, असं भालचंद्र गोसावी यांनी सांगितले.

  Bamboo Farming : आयटी क्षेत्रातील तरुणानं बांबू शेतीमध्ये केला जागतिक रेकॉर्ड! पाहा Video

  नाशिक महापालिकेला पडला विसर

  काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेत देखील हा उपक्रम राबवला गेला होता. मात्र, अवघ्या काही दिवसातच पुन्हा महापालिकेत जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम खरंच गरजेचा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून शहरांमधील प्रदूषणाचा आलेख हा वाढत आहे आणि यामुळे विविध आजारांना देखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेचा आदर्श इतर महापालिकेनी देखील घेण्याची गरज आहे.

  First published:

  Tags: Local18, Nashik