मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाविद्यालयातच एकमेकींचे केस ओढत तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी; नाशकातील घटनेचा Video Viral

महाविद्यालयातच एकमेकींचे केस ओढत तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी; नाशकातील घटनेचा Video Viral

नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. यात विद्यार्थीनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Kiran Pharate

नाशिक 18 नोव्हेंबर : अनेकदा आपल्याला रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी लोकांची हाणामारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, महाविद्यालयाच्या आवारात आणि तेही तरुणींमध्ये हाणामारी सुरू असल्याचं आपण फारच कमी वेळा पाहिलं असेल. सध्या नाशिकमधून अशा एक अजब घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळते.

Video : गाव गुंडांकडून तरुणाला बेदम मारहाण, ह्रदयाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद

नाशिकच्या गंगापूररोडवरील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. यात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तरुणींमध्ये कॉलेजच्या आवारातच हाणमारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. यात त्या एकमेकींना केस ओढून मारहाण करताना दिसतात.

या विद्यार्थीनींची हाणामारी सुरू असताना आजूबाजूला बरेच विद्यार्थी जमा झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र, कोणीही ही भांडणं सोडवण्यासाठी पुढे येत नाही. याठिकाणी विद्यार्थी मोठमोठ्याने ओरडत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. तिथेच उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबईलमध्ये कैद केला आहे, जो आता समोर आला आहे.

पुण्यात 'मुळशी पॅटर्न' चा थरार, बुधवार पेठेत तरुणांवर कोयत्याने सपासप वार, LIVE VIDEO

या तरुणींमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. व्हिडिओमध्ये चार तरुणी दिसतात. यातील दोघी एकमेकींचे केस ओढून हाणामारी करत आहेत. तर, इतर दोघी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Nashik, Shocking viral video