मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कांदा रस्त्यावर फेकत 'लाल वादळ' मुंबईच्या दिशेना; आंदोलनाचं उद्या ठरणार भवितव्य

कांदा रस्त्यावर फेकत 'लाल वादळ' मुंबईच्या दिशेना; आंदोलनाचं उद्या ठरणार भवितव्य

कांदा रस्त्यावर फेकत 'लाल वादळ' मुंबईच्या दिशेना

कांदा रस्त्यावर फेकत 'लाल वादळ' मुंबईच्या दिशेना

Nashik Long March : नाशिकमधून निघालेल्या शेतकरी लाँच मार्चमध्ये आज संतप्त शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 13 मार्च : कांदा आणि भाजीपाल्याचे घसरणारे दर आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरणांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. सरकारनं शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावल्यानं, आता हे वादळ मुंबईत धडकणार की शांत होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शेतकरी का करतायेत आंदोलन?

शेतमालाचे पडलेले भाव आणि हक्काच्या वन जमिनीसाठी नाशिक येथून मुंबई पायी लाँग निघाला आहे. रविवारी सायंकाळी हा लाँग मार्च आरोग्य विज्ञान विद्यापीठ या परिसरात मुक्कामी होता. याच दिवशी सायंकाळी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. मात्र, बैठकीत तोडगा न निघाल्याने लाँग मार्च सुरूच ठेवण्याचा निर्णय मोर्शीकरांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून आरोग्य विज्ञान विद्यापीठ नंतर नाशिक शहरात दाखल झाला. हा लाँग मार्च पेठ रोड, आरटीओ, आडगाव नाका, द्वारकामार्गे मुंबईकडे रवाना झाला आहे.

दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत तब्बल तीन तास बैठक पार पडली. मात्र, समाधान न झाल्याने लाँग मार्च सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानुसार आज दुसऱ्या दिवशी लाँग मार्च मुंबईकडे रवाना झाला आहे. लाँग मार्च मागे घ्या असा मुख्यमंत्र्यांचा निरोप आला तरी आम्ही मार्च सुरूच ठेवणार. सरकारनं फक्त घोषणा करू नये अशा शब्दांत आंदोलक शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.

वाचा - सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा भोगतोय 74 वर्षीय शेतकरी; जळगावातील घटना

उद्या (मंगळवारी) ठरणार मोर्चाचं भवितव्य

दरम्यान, उद्या दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. सद्यस्थितीत हा लाँग मार्च विधानसभेवर धडकणार हे निश्चित असून आत्तापर्यंत या लाँग मार्चने जवळपास 60 ते 70 किलोमीटरचा पायी प्रवास करत नाशिक शहरातून मुंबईकडे रवाना झाले आहे.

शेतकऱ्यांचा रस्त्यावर आक्रोश

नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सरकारप्रती आपला रोष व्यक्त करण्यासाठी कांद्यासह टोमॅटो आणि कोथिंबीरही शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली. कांद्याचे पडलेले भाव त्याचबरोबर सरकारची असलेली उदासीनता याबाबत शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. याचबरोबर माकप, किसान सभा आणि सम विचारी संघटनांच्या माध्यमातून पायी किसान लाँग मार्च सुरू करण्यात आला आहे. या लाँग मार्चमध्ये देखील शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चचे पडसाद अधिवेशनातही उमटले आहेत. विरोधकांनी कांदा आणि शेतीपिकांच्या घसरत्या दरावरुन सरकारवर निशाणा साधला. त्यामुळं आता मंगळवारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काही तोडगा निघतो? की हे लाल वादळ अधिवेशनात येवून धडकतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Nashik, Onion