मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मुलीच्या लग्नात का आले नाही?' जाब विचारणाऱ्या वृद्धासोबत कुटुंबाचे धक्कादायक कृत्य

'मुलीच्या लग्नात का आले नाही?' जाब विचारणाऱ्या वृद्धासोबत कुटुंबाचे धक्कादायक कृत्य

चांदवड

चांदवड

मुलीच्या लग्नाला का आले नाही? असा जाब विचारणाऱ्या व्यक्तीला कुटुंबाने जबर मारहाण केल्याची धक्कादयक घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

बब्बू शेख, प्रतिनिधी

नाशिक, 20 मार्च : लग्नात मानापानावरुन रूसण्याचे प्रकार तुम्हीही पाहिले असतील. मात्र, पुतणीच्या लग्नात का आले नाही, या किरकोळ कारणावरून पत्नी आणि मुलांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पुनमचंद पवार या वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चांदवडच्या कुंदलगावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण चांदवड तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदलगाव परिसरातील पवार कुटुंबीयांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. लग्नघरी बरीच गडबड सुरु होती. लग्नाचा दिवस उजाडला. पुतणीचे लग्न म्हणून काका लग्नाची तयारी करत होते. मात्र, पुतणीच्या लग्नात काकू आणि चुलत भाऊ आलेच नाहीत. लग्नही पार पडले. लग्नातील सर्वजण काकांना कुटुंबीय आले का नाही? म्हणून विचारात होते. लग्न झाल्यावर मृत पुनमचंद पवार हे घरी गेले. लग्नात का आले नाही? म्हणून बायको मुलांना जाब विचारला. याचा राग येऊन बायकोसह मुलांनी पुनमचंद यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे.

वाचा - आजारी ऊसतोड मजुराला कामावर येत नसल्याने मुकादमाची बेदम मारहाण; पुढं घडलं भयानक

चांदवड पोलीस ठाण्याचे एपीआय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पुनमचंद पवार यांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे घरी वारंवार भांडण होत असायचं. पवार हे कुटुंबीयांना शिवीगाळ करत असल्यानं कुटुंबीय वैतागले होते. अशातच कुंदलगाव येथे पवार कुटुंबीयांच्या घरी 18 मार्च रोजी लग्न सोहळा होता. पुतणीचे लग्न असल्याने पुनमचंद पवार हे सकाळपासून हे लग्न घरी तयारी करत होते. मात्र, त्यांच्या घरचे बायको आणि मुलं हे काही लग्नात आले नाहीत. पाहुणे मंडळी अनेकजण पुनमचंद यांना विचारणा करत होते. लग्न सोहळा आटोपला. त्यानंतर पुनमचंद हे नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी गेले. यानंतर बायको मुलांमध्ये वाद झाला. या वादात बायको आणि मुलांनी पुनमचंद यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

घटना घडल्यानंतर संबंधित मुलांनी चुलते भाऊराव यांना बोलावले. भाऊराव यांनी पुनमचंद यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत पुनमचंद यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चांदवड पोलीस ठाण्याचे एपीआय जाधव यांच्यासह सहकाऱ्यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी चांदवड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नी सुनीतासह दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Nashik