मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, म्हणून...', सुहास कांदेंचं धक्कादायक विधान

'सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, म्हणून...', सुहास कांदेंचं धक्कादायक विधान

सुहास कांदे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फाईल फोटो

सुहास कांदे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फाईल फोटो

'सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, हिजडे झालो होतो, म्हणून हा निर्णय घेतल', असं विधान सुहास कांदे यांनी आज नाशिकमध्ये केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Chetan Patil

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 24 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान मुंबई हायकोर्टाकडून नाकारण्यात आल्यानंतर आता शिंदे गटाचा बीकेसी मैदानात मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी नाशिकमध्ये तयारी सुरु आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी शिंदे गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना 'सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, हिजडे झालो होतो, म्हणून हा निर्णय घेतल', असं विधान त्यांनी केलं.

"आपल्याला मुंबईतील BKC मैदानावर जायचं आहे. शिवतीर्थापेक्षा बीकेसीचं मैदान दुप्पट मोठं आहे. आपल्याला मैदान भरवायचं आहे. तिथे जाण्यासाठी ट्रेन, बस, गाड्या, नाश्ता जी काय व्यवस्था लागेल ती सांगा. ठाण्यात जशी ताकद, तशीच नाशिकमध्ये ताकद आहे. पालघरमध्ये साधुंना मारलं, तेव्हा आम्हाला गप्प बसावं लागलं होतं", असं सुहास कांदे म्हणाले.

(एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिवसेनेमध्ये पुन्हा मोठं खिंडार)

"कुठे गेली बाळासाहेबांची शिवसेना? कुठे गेलं हिंदुत्व? सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, हिजडे झालो होतो, म्हणून हा निर्णय घेतला. जाताना विधान परिषदेला 2 आमदार आम्ही निवडून दिले, खोका तर सोडाच कुणाचाही साधा चहा देखील घेतला नाही", असं कांदे म्हणाले.

"आम्हाला गद्दार म्हणता, आम्ही गद्दारी केली नाही. बीकेसीवर आपल्याला एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी जायचंय. बाळासाहेबांच्या विचारांचं सोने लुटायला जायचंय. आम्ही पैशांसाठी गेलो नाही, हिंदुत्वासाठी उठाव केला", असा दावा त्यांनी केला.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांविरोधातील याचिका मला मागे घ्यायला सांगितली होती. तेव्हाच मी राजीनामा दिला होता. तीन वर्षांनी पडेल, भुजबळांचा मुलगा निवडून येईल, त्यापेक्षा आजच राजीनामा घ्या, असं सांगितलं तेव्हा मला निधी मिळाला. धनुष्यबाण चिन्हं आपल्यालाच मिळेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

First published:

Tags: Eknath Shinde, Nashik, Shiv sena, Uddhav Thackeray