मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'फडणवीसांना भेटू म्हणालो, पण...', महाजनांच्या गौप्यस्फोटावर नाथाभाऊंचा गुगली, खडसेंच्या मनात काय?

'फडणवीसांना भेटू म्हणालो, पण...', महाजनांच्या गौप्यस्फोटावर नाथाभाऊंचा गुगली, खडसेंच्या मनात काय?

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. नाशिकच्या कार्यक्रमात फडणवीस आणि खडसे यांची भेट झाली. या कार्यक्रमात खडसेंनी फडणवीसांच्या कानात एकदा भेटून मिटवून टाकू, असं सांगितल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Shreyas

जळगाव, 3 ऑक्टोबर : भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. नाशिकच्या कार्यक्रमात फडणवीस आणि खडसे यांची भेट झाली. या कार्यक्रमात खडसेंनी फडणवीसांच्या कानात एकदा भेटून मिटवून टाकू, असं सांगितल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजन यांच्या या दाव्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण फडणवीस यांना फक्त भेटायचंय असं म्हणालो होतो, पण मिटवून टाकू असं म्हणालो नाही, असं खडसे यांनी सांगितलं आहे.

'महानुभाव पंथाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी फडणवीस यांची भेट मागितली. मिटवून टाका, असं म्हणालेलो नाही. फडणवीस यांच्याशी बोलताना मला तुम्हाला भेटायचं आहे, असं म्हणालो. पुढच्या आठवड्यात कळवतो, असं फडणवीस यांनी सांगितलं. तेवढाच विषय झाला. मिटवायचं काय राहिलं आहे? सगळे प्रकार तर सुरूच झाले आहेत,' असं एकनाथ खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होते, ते बराच वेळ तिकडे बसले, पण अमित शाह यांनी भेटायला नकार दिला, असं रक्षा खडसेंनी आपल्याला सांगितलं आहे, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला. दरम्यान मी अमित शाह यांचीही भेट घेणार असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट नेमकी कशासाठी घ्यायची आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath khadse