मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पालघर आणि नाशिक भूकंपाने हादरलं; राज्यात पहाटेच जाणवले धक्के

पालघर आणि नाशिक भूकंपाने हादरलं; राज्यात पहाटेच जाणवले धक्के

पालघरमधील डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचा हादरा जाणवला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले

पालघरमधील डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचा हादरा जाणवला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले

पालघरमधील डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचा हादरा जाणवला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Kiran Pharate

राहुल पाटील, पालघर 23 नोव्हेंबर : राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकजवळ 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. तर दुसरीकडे पालघरमध्येही भूकंपाचा हादरा बसला. पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी याठिकाणी भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. भूकंपाच्या धक्क्याने पालघर पुन्हा हादरलं आहे. भूकंपाच्या तीव्रतेची 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे.

नागपुरातील मिरची मार्केटमध्ये आग; कोट्यवधींचं नुकसान, घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO

पालघरमधील डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचा हादरा जाणवला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार बुधवारी पहाटे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.

नाशिमधील या भूकंपाचे धक्के पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जमिनीखाली 5 किमी खोलीवर जाणवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. याशिवाय मंगळवारी लडाखच्या कारगिल जिल्ह्यातही ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

कोकणातला भंगारचोर नेता कोण? बंद कंपन्यांमधलं 3 कोटींचं भंगार गायब!

पालघरमध्ये अनेकदा जाणवले धक्के -

पालघरमध्ये याआधीही 2018 सालापासून अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. मात्र, मागील वर्षभरापासून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली होती. बहुतेक भूकंपाची तीव्रता कमी होती. मात्र आज पहाटे बसलेल्या या मध्यम स्वरुपाच्या धक्क्यामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील नागरिक खडबडून जागे झाले. या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले होते.

First published:

Tags: Earthquake, Nashik