मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विटांनी भरलेला ट्रॅक्टर उलटला, नाशकातील अपघाताचा LIVE VIDEO आला समोर

विटांनी भरलेला ट्रॅक्टर उलटला, नाशकातील अपघाताचा LIVE VIDEO आला समोर

Nashik accident caught in cctv: नाशिक जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात घटनास्थळावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघाताचा हा सीसीटीव्ही आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

Nashik accident caught in cctv: नाशिक जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात घटनास्थळावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघाताचा हा सीसीटीव्ही आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

Nashik accident caught in cctv: नाशिक जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात घटनास्थळावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघाताचा हा सीसीटीव्ही आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 16 डिसेंबर : नाशिक जिल्ह्यात विटांनी भरलेल्या एका ट्रॅक्टरचा अपघात (Tractor accident) झाला आहे. या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरवर काही मजूर सुद्धा बसले होते. अपघात होताच हे मजूर खाली कोसळले (labors collapsed after accident) आणि ट्रॅक्टरची ट्रॉलीही उलटली. नाशिक जिल्ह्यातील लासगलाव (Lasalgaon Nashik) येथे ही घटना घडली आहे. अपघाताचा हा थरार घटनास्थळी असलेल्या एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. (Caught in Camera bricks tractor trolley overturns in Nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी दुपारच्या सुमारास झाला आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने येणाऱ्या गाडीने कट मारल्याने ट्रॅक्टर चालकाने अर्जंट ब्रेक घेतला. जागेवरच ब्रेक घेतल्याने विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून त्यात दिसत आहे की, विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर काही मजूर बसले आहेत. ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने हे मजूर सुद्धा खाली कोसळले.

विटांनी भरलेली ट्रॉली उलटून झालेल्या या अपघातात सुदावाने ट्रॅक्टरवरील मजूरांना गंभीर दुखापत झालेली नाहीये. अपघातात हे मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. हा विचित्र अपघात घटनास्थळावर असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

वाचा : भरधाव Audi कारने नागरिकांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

वसईत दुचाकी एकमेकांना धडकल्या

वसईच्या आकटाण गावातील चार रस्त्यावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. या मार्गावर दोन दुचाकींचा अपघात झाला आहे. दोन्ही मार्गावरून येणाऱ्या दुचाकी आपापसांत जोरदार धडकल्या. दोन्ही दुचाकी इतक्या वेगात धडकल्या की अपघातात बाईक चालक चालक रस्त्याच्या कडेला फेकला गेला. सुदैवाने कोणतीही या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकीवर स्वारांना गंभीर दुखापत झाली आहे. 14 डिसेंबर 2021 रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रस्त्याकडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या भीषण अपघाताचा थरार कैद झाला आहे. याच ठिकाणी समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे. मात्र अद्याप त्यावर उपाययोजना केलेली दिसून येत नाही.

First published:
top videos

    Tags: Accident, Cctv footage, Nashik