मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मशिदीची अजान अन् खुनी गणपतीची आरती एकाचवेळी; आतापर्यंत पाहिलेला सर्वात भारी Video

मशिदीची अजान अन् खुनी गणपतीची आरती एकाचवेळी; आतापर्यंत पाहिलेला सर्वात भारी Video

आतापर्यंत तुम्ही मुंबई-पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळ पाहिली असतील. परंतू धुळ्याच्या या खुनी गणपतीला तोड नाही.

आतापर्यंत तुम्ही मुंबई-पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळ पाहिली असतील. परंतू धुळ्याच्या या खुनी गणपतीला तोड नाही.

आतापर्यंत तुम्ही मुंबई-पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळ पाहिली असतील. परंतू धुळ्याच्या या खुनी गणपतीला तोड नाही.

धुळे, 9 सप्टेंबर : आतापर्यंत तुम्ही मुंबई-पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळ पाहिली असतील. परंतू धुळ्याच्या या खुनी गणपतीला तोड नाही. गेल्या 100 वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या गणपतीची मिरवणूक सर्वाथाने वेगळी आणि महत्त्वपूर्ण आहे. धुळे शहरातील मानाचा खुनी गणपतीचे खुनी मशिदी जवळ मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मानाचा गणपती म्हणून खुनी गणपतीची वेगळी ओळख आहे. खुनी मशिदीत अजान सुरू झाली. त्याचवेळेस खुनी गणपतीची चंदनाच्या पालखीतुन निघालेली विसर्जन मिरवणूक खुनी मशिदी समोर पोहोचली. यावेळी खुनी मशिदीवरून गणपती बाप्पाच्या पालखीवर फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं. यावेळी खुनी मशिदीच्या मौलानांसह मुस्लीम बांधवांनी खुनी गणपतीची आरती केली. मशिदीतील अजान व गणपतीची आरती ही एकाचवेळी होते. म्हणून हिंदू मुस्लिम एकतेचा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्यने गणेशभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. १८९४ पासून सूर असलेली ही परंपरा निरंतर सुरू आहे. Nashik : तांडव नृत्यानं गाजवली विसर्जन मिरवणूक, महादेवांना पाहण्यासाठी मोठी गर्दी VIDEO खुनी गणपती नावामागील कहाणी... हिंदू मुस्लीम ऐक्याचा प्रतीक म्हणून खानदेशात खुनी गणपतीची मान्यता आहे. १८९४ साली पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची लोकमान्य टिळकांनी सुरुवात केल्यानंतर धुळे शहरात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. यावेळी विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात वाद झाले. या वादा दरम्यान इंग्रजांनी जमावावर बेछूट गोळीबार केला. अनेकांचं रक्त सांडलं. या घटनेचा निषेध म्हणून हिंदू मुस्लीम सर्व बांधव एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांचा निषेध केला. तेव्हापासून या गणपतीला खुनी गणपती तर शाही मशिदीला खुनी मशीद अस नाव पडलं. दरवर्षी खुनी मशिदीजवळ गणपती आल्यानंतर खुनी मशिदीतील मुस्लीम बांधव गणपतीची आरती करतात.
First published:

Tags: Dhule, Ganesh chaturthi

पुढील बातम्या