मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?" : देवेंद्र फडणवीस

"आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?" : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)

देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)

Marathi Sahitya Sammelan Nashik: नाशिकमध्ये सुरू झालेल्या साहित्य संमेलनात देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीयेत. या संदर्भात त्यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.

नाशिक, 4 डिसेंबर : 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) काल (3 डिसेंबर) पासून नाशिक (Nashik) येथे सुरू झालं आहे. या साहित्य संमेलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीयेत. नाशकात असून सुद्धा साहित्य संमेलनात जाणार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जाणार नाहीयेत. यामागचं नेमकं कारण काय आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं, "मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण... जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मन होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?"

देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं, "या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टहासातून त्यांचे नाव देम्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे."

नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ. भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराटी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

वाचा : 'सामना आणि संपादकांचे केंद्रबिंदू बदललेत' : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांनी पुढे म्हटलं, केवळ स्वातंत्रयवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कांदबरीकरा, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्यकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?

काय म्हणाले छगन भुजबळ ?

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवर छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले. आमचे काम आम्ही केले ज्यांना यायचे ते येतील एवढे बोलून छगन भुजबळ निघून गेले.

असा राहिला संमेलनाचा पहिला दिवस!

अखेर 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. मात्र,साहित्य संमेलनाच्या इतिहासात या संमेलनाची एक वेगळीच नोंद झाली. ती म्हणजे, मावळते संमेलनाध्यक्षांना, नूतन समेलनाध्यक्षांना प्रत्यक्ष सूत्र देताच आली नाही. कारण मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो आणि नूतन समेलनाध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर ( Dr. Jayant Narlikar) दोघंही या संमेलनास अनुपस्थित होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) हे ऑनलाइन सहभागी होणार होते मात्र त्यांचाही ऑनलाइन सहभाग नव्हता.

कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून रखडलेले साहित्य संमेलन अखेरीस नाशिकनगरीत भरले. साहित्यांच्या मांदियाळीत संमेलनाला सुरुवात झाली. 'मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा आणि साहित्यिकांना स्वातंत्र्य असावं' असा सूर जवळपास सगळ्यांचाच होता. मात्र याच कार्यक्रमात स्वागताध्यक्ष आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेला खडा सवाल चर्चेत आला. 'संमेलन करण्यासाठी तुम्हाला राजाश्रय हवा मग राजकारणी का नको ?' असा सवालच भुजबळांनी साहित्यकांना विचारला.

First published:

Tags: Chagan bhujbal, Devendra Fadnavis, Nashik