मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशकात मध्यरात्री हाणामारीचा थरार; मिठी मारल्याने वादाला फुटलं तोंड, तरुणावर जीवघेणा हल्ला

नाशकात मध्यरात्री हाणामारीचा थरार; मिठी मारल्याने वादाला फुटलं तोंड, तरुणावर जीवघेणा हल्ला

Crime in Nashik: नाशिक शहरातील आडगाव परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. मिठी मारल्याच्या कारणातून काही तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.

Crime in Nashik: नाशिक शहरातील आडगाव परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. मिठी मारल्याच्या कारणातून काही तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.

Crime in Nashik: नाशिक शहरातील आडगाव परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. मिठी मारल्याच्या कारणातून काही तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.

प्रतिनिधी, लक्ष्मण घाटोळ

नाशिक, 14 डिसेंबर: नाशिक (Nashik) शहरातील आडगाव परिसरात एक विचित्र घटना समोर आली आहे. मिठी मारल्याच्या (Hugged to friend) कारणातून काही तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला (Young man injured after attack) असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दीपक वाघमारे असं जीवघेणा हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी जखमी दीपकच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्यामुळे दीपक आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आडगाव परिसरात आला होता. यावेळी आरोपी तरुणाने वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली. त्यामुळे दीपक याने मित्राला मिठी का मारली असा जाब विचारला.

हेही वाचा-महिलेनं स्वत:च पुसलं कुंकू; वडिलांनीही दिली साथ, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

यावेळी संतापलेल्या आरोपीनं दीपकवर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाला असून एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहे. काल 13 डिसेंबर रोजी याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही घटना 12 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे.

First published:

Tags: Crime news, Nashik