Home /News /maharashtra /

शेतात आढळले 10 मोरांचे मृतदेह, नाशिकमधील दुर्दैवी घटना

शेतात आढळले 10 मोरांचे मृतदेह, नाशिकमधील दुर्दैवी घटना

 मृत्य झालेल्या मोरांमध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे. मृत्य झालेल्या मोरांचा शवविच्छेदन करण्यासाठी नांदगाव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत पाठवण्यात आले आहेत

मृत्य झालेल्या मोरांमध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे. मृत्य झालेल्या मोरांचा शवविच्छेदन करण्यासाठी नांदगाव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत पाठवण्यात आले आहेत

मृत्य झालेल्या मोरांमध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे. मृत्य झालेल्या मोरांचा शवविच्छेदन करण्यासाठी नांदगाव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत पाठवण्यात आले आहेत

नांदगाव, 28 मे :  राष्ट्रीय पक्षी असलेल्या 10 मोरांचे (peacocks ) मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना नाशिक (nashik) जिल्ह्यातील नांदगावच्या (nandgaon) आमोदे सतारी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे पक्षी प्रेमीमध्ये खळबळ उडाली आहे. मृत मोरांमध्ये 4 नर आणि 6 मादीचा समावेश आहे. पाण्याविना किंवा उष्माघाताने मोरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसंच विषबाधेतून या मोरांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे. नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरात शनिवार 28 मे रोजी दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आमोदे येथील विठ्ठल लाला पगार यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०० या क्षेत्राला लागून असलेल्या खाजगी आणि ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या परिसरात काही मोर मृत्युमुखी पडले असल्याचे शेतकरी दीपक पगार हे शेत कामासाठी शेतात जात असताना लक्षात आली. त्यांना ही बाब निर्दशनास आल्यानंतर लगेच ही माहिती आमोदे गावातील पत्रकार महेंद्र पगार यांना दिली. पगार यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी जवळपास दहा मोर मृत्युमुखी पडल्याचे आढळुन आले. (ज्वेलर्स मालकाच्या मुलीच्या धाडसापुढे दरोडेखोरांना फुटला घाम, चोरीचा फसला डाव) वन विभागाचे आर एफ ओ चंद्रकांत कासार वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ, एन के राठोड, आर के दौंड, वनपाल सुनील महाले, वनमजुर विकास बोडखे आदींनी घटनेचा पंचनामा केला. सदर मोरांचा मृत्यू हा विषबाधाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत पुढील तपास नांदगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत. (झाड कापण्याच्या मशीनने पत्नी-मुलांचा चिरला गळा; लग्नाच्या वाढदिवशी स्वत:लाही...) मृत्य झालेल्या मोरांमध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे. मृत्य झालेल्या मोरांचा शवविच्छेदन करण्यासाठी नांदगाव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर एकाच वेळी 10 मोरांचा मृत्यू नेमा कशामुळे झाला याचा उलगडा होणार आहे. या प्रकरणाचा वनविभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या