नाशिक, 03 डिसेंबर : 'शिवरायांबद्दल राज्यपालांनी, भाजप प्रवक्ते आणि भाजप मंत्र्यांनी विधानं केली आहे. त्यांना शिव्या द्यावात, आम्ही त्यांच्यावर फुलं उधळू. शिवाजी महाराज यांचा अपमान तुम्ही सहन करता, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान केलं, ते तुम्ही सहन करताय, त्यांचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, आई-बहिणीवरून शिव्या देऊन दाखवा, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला ओपन चॅलेंज दिलं.
संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. सहकुटुंब ते शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला पोहोचले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.
मला जर कुणी गद्दार म्हणून शिव्या देत असेल तर तो मी माझा सन्मान समजतो. कारण ते गद्दार आहे. खरं म्हणजे, शिंदे गटाला आणखी खालच्या पातळीवर जाऊ शिव्या देऊ शकतो. शिवरायांबद्दल राज्यपालांनी, भाजप प्रवक्ते आणि भाजप मंत्र्यांनी विधानं केली आहे. त्यांना शिव्या द्यावात, आम्ही त्यांच्यावर फुलं उधळू, शिवाजी महाराज यांचा अपमान तुम्ही सहन करता, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान केलं, ते तुम्ही सहन करत आहे. त्यांचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या, आई-बहिणीवरून शिव्या देऊन दाखवा, महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल, असा सणसणीत टोला राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
('भाजप हा नक्की किती तोंडी नाग? विखेंचा वक्तव्यावरून सेनेचा तिखट सवाल)
शिवरायांबद्दल प्रेम दाखवण्याचे खोटं ढोंग आहे. शिवप्रेमाची महाराष्ट्रात लाट आली आहे. कुठलं शिवप्रेम आहे. भाजपला आम्ही नागाची उपमा दिली. मोदींना रावण म्हटलं तर टीका करतात, राज्यात शिवरायांचा अपमान होतो तर तिथे तुम्ही थंड पडता, तिथे नाग फणा काढत नाही, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.
'गुवाहाटीवरून आल्यानंतर आसाम भवन उभारण्याची घोषणा केली. आनंद आहे. राज्याराज्यांमध्ये संबंध दृढ झाले पाहिजे. दिल्लीत प्रत्येक राज्याचे भवन आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जर घोषणा केली असेल की, सीमाभागात भवन उभारण्याची घोषणा केली आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो, मुंबईमध्ये कानडी बांधवांची भवन मुंबईत उभारू दिली आहे. हॉल आहे, अनेक भवनं आहे. या लोकांशी काही वाद नाही. पण कानडी लोकांशी ही लोक वाद निर्माण करत आहे. मुद्दामहून वाद घातले जात आहे. त्यामुळे सोलापूर, कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक सरकार जर भवन उभारत असेल तर आम्हाला सुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा दिली पाहिजे. बेळगावमध्ये आणि बंगळुरूमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची आमची इच्छा आहे. आधी त्यासंबंधात निर्णय झाला पाहिजे. आधी हा निर्णय झाला पाहिजे, मग आम्ही तुमचा विचार करू' असंही राऊत यांनी सुनावलं.
('75 वर्षांत काही दिलं आता आम्हाला जाऊ द्या', सोलापूरमध्ये फडकावले कन्नड झेंडे)
याकडे सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे, हा लव्ह जिहाद आहे का हे पाहावं लागेल. आफताब आणि श्रद्धाचा विषय अत्यंत निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींची हत्या ही हिंदू मुलांकडून झाली आहे. मुळात ही विकृती आणि अमानुषात आहे. ज्यामध्ये जात धर्म न आणता प्रत्येक कन्येचं रक्षण झालं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.