मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Coronavirus: साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोरोनाची धडक, संमेलनाला आलेल्यांपैकी दोघांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह

Coronavirus: साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोरोनाची धडक, संमेलनाला आलेल्यांपैकी दोघांचे कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह

Coronavirus in Maharashtra: नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्याच दरम्यान तेथे दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 5 डिसेंबर : नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) करोनाचा (Corona) शिरकाव झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात सुरू असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक करोना बाधित सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी पालिकेची धावपळ सुरू झाली आहे. (Two people tests positive in Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Nashik)

या दोन व्यक्तींना त्यांची तयारी असल्यास बिटको रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले जाणार आहे. अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. यातील एक जण पिंपरी येथील निवासी आहे तर दुसरा आळंदी येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा : परदेशातून पुण्यात आलेल्या व्यक्तीच्या कोविड रिपोर्टमध्ये आढळला हा Corona variant

साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोविड चाचणी करण्यात येते. या चाचणी दरम्यान दोघांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. आज साहित्य संमेलनाचा समारोप आहे. त्यातच नागरिकांनी मोठ्या प्रणाात येथे गर्दी केली आहे. अशा परिस्थितीत दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.

देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वांनी घाबरण्याचं नाही मात्र काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी अद्यापही नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. साहित्य संमेलनातही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पहायला मिळत आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांकडेही नागरिकांनी दुर्लक्ष करत गर्दी केल्याचं दिसून आलं.

वाचा : "आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?" : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण डोंबिवलीत

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे 24 नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

भारतात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण

कर्नाटक - 2 जणांना ओमायक्रॉन संसर्ग

गुजरात - 1 व्यक्तीला ओमायक्रॉन संसर्ग

महाराष्ट्र - डोंबिवलीतील एका व्यक्तीला ओमायक्रॉन संसर्ग

दिल्ली - 1 व्यक्तीला ओमायक्रॉन संसर्ग

First published:

Tags: Coronavirus, Nashik