मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! नाशकात कॉलेज तरुण-तरुणींमध्ये तुफान राडा; धारदार शस्त्राने विद्यार्थ्यावर केले वार

धक्कादायक! नाशकात कॉलेज तरुण-तरुणींमध्ये तुफान राडा; धारदार शस्त्राने विद्यार्थ्यावर केले वार

Crime in Nashik: नाशिक शहरात एका महाविद्यालयीन तरुणावर काही जणांनी सशस्त्र हल्ला (Attack on college student) केला आहे. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी (College student injured) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

नाशिक, 04 डिसेंबर: मुंबई, नागपूर आणि पुण्यानंतर आता नाशिकमध्ये देखील गुन्हेगारी वाढत आहे. गेल्या काही दिवसांत नाशकात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता नाशिक शहरातील वावरेनगर याठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणावर काही जणांनी सशस्त्र हल्ला (Attack on college student) केला आहे. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी (College student injured) झाला आहे.

या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियात वेगाने व्हायरल (Viral video) होतं आहे. महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहराच्या वावरेनगर परिसरातील एका महाविद्यालयात काही तरुण-तरुणींमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या भांडणातून काही जणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.

हेही वाचा-Beed: पत्नीचे शेजाऱ्यासोबत होते अनैतिक संबंध; कंटाळलेल्या पतीनं उचललं भयावह पाऊल

हा संतापजनक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. संबंधित सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये काही कॉलेज तरुण आणि तरुणी जखमी विद्यार्थ्याला घेऊन पळताना दिसत आहेत. तरुणावर हल्ला झाल्यानंतर, पुन्हा हल्ला होईल या भीतीने संबंधित तरुण-तरुणी धावपळ करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-पुण्यात 'अंडरवेअर गँग'चा धुमाकूळ, मोबाइल चोरीसाठी खास अंडरवेअरचा वापर

महाविद्यालयीन तरुण-तरुणीमध्ये नेमक्या कोणत्या कारणातून वाद झाला? याचं कारण अद्याप समोर आलं नाही. जखमी मुलगा आपल्या मित्र-मैत्रिणीसह पळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. महाविद्यालयाच्या आवारात अशाप्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने कॉलेजच्या अन्य विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

First published:

Tags: Crime news, Nashik