मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राज्यात पुन्हा ढगाळ स्थिती; तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, कसं असेल हवामान?

राज्यात पुन्हा ढगाळ स्थिती; तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, कसं असेल हवामान?

Weather Forecast in Maharashtra: मागील चार पाच दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीसह पाऊस (Rainfall with cold) आणि बर्फवृष्टी (hailstorm) होत आहे.

Weather Forecast in Maharashtra: मागील चार पाच दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीसह पाऊस (Rainfall with cold) आणि बर्फवृष्टी (hailstorm) होत आहे.

Weather Forecast in Maharashtra: मागील चार पाच दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीसह पाऊस (Rainfall with cold) आणि बर्फवृष्टी (hailstorm) होत आहे.

पुणे, 03 जानेवारी: मागील चार पाच दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीसह पाऊस (Rainfall with cold) आणि बर्फवृष्टी (hailstorm) होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह मध्य भारतात जाणवत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील किमान तापमानात झपाट्याने चढ-उतार (temperature in maharashtra) होत आहेत. काल अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढल्यानंतर, आज पुन्हा राज्यात 1 ते 2 अंश सेल्सिअसने किमान तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच राज्यात सध्या ढगाळ स्थिती (Cloudy weather) निर्माण झाली असून येत्या काही दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात एकीकडे थंडीचा कडाका सुरू असताना, खान्देश आणि विदर्भात सरी बरसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 6 जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रात पुढील चार दिवस थंडीमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र आगामी काही दिवसांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-पुणेकर सावध राहा..! दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोकं कोरोनाबाधित

6 जानेवारीनंतर उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हुडहुडी वाढण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सकाळी धुके, तसेच मंद प्रकाश अशी स्थिती राहू शकते.

हेही वाचा-Viagra ची गोळी ठरली गेमचेंजर; कोरोनामुळं 45 दिवस कोमात असलेली नर्स झाली बरी

उत्तर भारतात तुरळक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी

उत्तर भरतात सध्या कडाक्याची थंडी सुरू असून काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहेत. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी गारपीटदेखील झाली आहे. येत्या काही दिवसांत पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात या भागात गारवा वाढू शकतो. हरियाणात पुढचे सातही दिवस थंडीची लाट असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मात्र जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. अलीकडेच तामिळनाडूच्या किनारी प्रदेशात आणि आसपासच्या भागांत पावसानं थैमान घातलं आहे.

First published:

Tags: Weather forecast, महाराष्ट्र