मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

चर्चमधील फादरने पेट्रोल ओतून स्वत:ला घेतलं पेटवून; धक्कादायक घटनेनं नाशिक हादरलं!

चर्चमधील फादरने पेट्रोल ओतून स्वत:ला घेतलं पेटवून; धक्कादायक घटनेनं नाशिक हादरलं!

(फोटो-दिव्य मराठी)

(फोटो-दिव्य मराठी)

Crime in Nashik: नाशकातील सेंट थॉमस चर्चमध्ये एका फादरनं स्वत:ला पेटवून घेत (church's father set himself on fire) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

  • Published by:  News18 Desk

नाशिक, 20 डिसेंबर: नाशिक शहरातील शालिमार येथील सेंट थॉमस चर्चमध्ये एका फादरनं स्वत:ला पेटवून घेत (church's father set himself on fire) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. धर्मगुरुंनी चौकशीबाबत नोटीस पाठवल्यानंतर, संबंधित फादरने चर्चमध्येच अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला (Attempt to commits suicide) आहे. यावेळी आसपासच्या लोकांनी जमिनीवर मॅट त्यांच्या अंगावर टाकून आग विझवली आहे. या घटनेत ते 18 टक्के भाजले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चर्चमधील फादरने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अनंत आपटे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या फादरचं नाव असून ते 2004 ते 2017 आणि 2018 ते 2021 पर्यंत सेंट थॉमस चर्चचं कामकाज पाहत आहेत. याशिवाय संत आंद्रीया चर्चचाही अतिरिक्त भार आपटे यांच्यावर आहे. दरम्यान अहमदनगर येथील धर्मगुरू बिशप शरद गायकवाड यांनी आपटे यांना नोटीस बजावली होती. आपटे यांनी चर्चमध्ये अपहार केल्याने आणि कामकाजात अनियमितता असल्याने त्यांच्या विरोधातील काही तक्रारी धर्मगुरुंकडे गेल्या होत्या.

हेही वाचा-डोंबिवली गँगरेप प्रकरण: 33 पैकी 4 नराधमांना जामीन; पीडितेनं उचचलं मोठं पाऊल

या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मगुरु बिशप गायकवाड यांनी अनंत आपटे यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे आपटे धर्मगुरू बिशप शरद गायकवाड यांच्याकडे आपलं म्हणणं मांडायला गेले होते. यावेळी गायकवाड यांनी आपटे याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे रागाच्या भरात आपटे यांनी 'तुला काय करायचं ते कर' असं धर्मगुरुंना सुनावलं.

हेही वाचा-विवाहितेवर शेजाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार, भलत्याच कारणावरुन करायचे ब्लॅकमेल

यानंतर काही वेळातचं आपटे यांनी स्वत: चर्चमध्ये स्वत:वर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं. यावेळी चर्चमध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांनी तातडीने जमिनीवरील मॅट त्यांच्या अंगावर टाकून आग विझवली आणि तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेत आपटे हे 18 टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Crime news, Nashik