मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्याविरोधात भुजबळांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले...

धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्याविरोधात भुजबळांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले...

 मी धमकी दिली नाही, बोललो देखील नाही. पण हे जे काही सुरू आहे ते या सरस्वती वादाचा फायदा घेत त्याने केलं आहे.

मी धमकी दिली नाही, बोललो देखील नाही. पण हे जे काही सुरू आहे ते या सरस्वती वादाचा फायदा घेत त्याने केलं आहे.

मी धमकी दिली नाही, बोललो देखील नाही. पण हे जे काही सुरू आहे ते या सरस्वती वादाचा फायदा घेत त्याने केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  sachin Salve

नाशिक, 01 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. चेंबूर येथील एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने हा गुन्हा दाखल केला आहे.अखेर या प्रकरणी भुजबळ यांनी तक्रारदाराविरोधात धक्कादायक खुलासा केला आहे.

धमकी दिल्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्याविरोधात ललितकुमार टेकचंदानी यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल पत्रकार परिषद घेऊन भुजबळांनी खुलासा केला आहे.

'मला माहित नाही काय गुन्हा दाखल झाला. वर्तमान पत्र आणि माध्यमांमधून समजलं. मागच्या 10 वर्ष जे आमच्या सोबत होते ज्यांनी आमच्या विरुद्ध या पूर्वी अनेक गुन्हे दाखल केले आहे. त्या टेकचंदानी यांनी गुन्हा दाखल केला.

त्यांच्यासोबत काहीही संबंध नाही त्यांचा नंबर देखील डिलिट केले आहे, पण सतत मला मेसेज करून त्रास देत होता, म्हणून मी सदर नंबर तपासण्यासाठी कार्यकर्त्याला सांगितलं पुण्याच्या कार्यकर्त्याने त्याला विचारलं तू भुजबळांना का त्रास देतो. त्या वेळी त्यांनी सांगितलं समोर येऊन चर्चा करू, असा खुलासा भुजबळांनी केला.

(Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार, व्यापाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

'मी त्याला कधीही फोन केला नाही. दुसऱ्याने केला तो ही त्याने उचललं नाही. जे काही झालं ते चॅटिंगवर झालं. कार्यकर्त्यासोबत आहे. पण त्यात देखील धमकी दिलेली नाही. मी धमकी दिली नाही, बोललो देखील नाही. पण हे जे काही सुरू आहे ते या सरस्वती वादाचा फायदा घेत त्याने केलं आहे. हे जे काही घडलं त्या बद्दल मी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणाची चौकशी करावी. मी जर त्यांच्या सोबत बोलत नाही तर त्याने मला का त्रास द्यावा. 'छगन लाल चिकी खाय बिकी खाय' असे मेसेज मला का करावे. मी त्याच्याशी कधीही बोललो नाही त्याच्याकडून मला त्रास दिला गेला. सारखे सारखे मला त्याने निगेटिव्ह मेसेज केले. तो व्यक्ती अगोदर मुंडे साहेब यांच्याकडे होता. त्यानंतर आमच्या सोबत काम केलं आहे, असा खुलासाही भुजबळांनी केला.

(युती सरकारमध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट)

नंतर त्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आम्ही त्याला बाजूला केलं आणि म्हणून त्याने हे सगळ तक्रारी सुरू केले आहे. मी काहीही तक्रार सध्या करणार नाही वकिलांचा सल्ला घेईल. मी सरकारला पत्र लिहिलं आहे ते योग्य ती कारवाई करतील, असंही भुजबळ म्हणाले.

राहुल शेवाळे यांनी देखील अनभिज्ञपणे असं ट्विट केलं असेल. मला या मागे कुणाचाही हात असेल असं वाटत नाही. असं घाणेरडं कृत्य कोणीही करू शकत नाही. या पूर्वी त्याने आम्हाला अनेक केसेस करून गुंतवलं. मात्र न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला आहे, असंही भुजबळ म्हणाले.

First published: