मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जिद्दीला सलाम! रेल्वेत भीक मागणारी जळगावची तृतीयपंथी चाँद पोलीस भरतीत अव्वल; लहानपणीच कुटुंबानं सोडलं यल्लमा देवीला

जिद्दीला सलाम! रेल्वेत भीक मागणारी जळगावची तृतीयपंथी चाँद पोलीस भरतीत अव्वल; लहानपणीच कुटुंबानं सोडलं यल्लमा देवीला

चाॅंद उर्फ बेबो तडवी

चाॅंद उर्फ बेबो तडवी

ही यशोगाथा आहे भुसावळच्या चोवीस वर्षीय तृतीयपंथी असलेल्या चाॅंदची. चँदने परिस्थितीशी संघर्ष करत यशाला गवसवणी घातली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 24 मार्च, इम्तियाज अली : ही यशोगाथा आहे भुसावळच्या चोवीस वर्षीय चाॅंदची, तृतीयपंथीयांना वेगळा न्याय नको म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना देखील समाविष्ट करून घ्यावे असा निर्णय दिला. भुसावळमधील तृतीयपंथी चँदने या संधीचं सोनं केलं. पोलीस भरतीमध्ये धुळे येथे जाऊन मैदान मारणारी चाॅंद ही राज्यातील प्रथम तृतीयपंथी पोलीस होणार आहे.

        तीन भावंडांची जबाबदारी 

चाॅंदचा जन्म भुसावळ येथे झाला. आजी व आई अचानक वारल्यामुळे तीनही भावंडांची जबाबदारी तिच्यावर आली. रेल्वे स्टेशनवर व धावत्या गाडीत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या चाॅंदच्या जीवनात उच्च न्यायालयाच्या या एका निर्णयाने रंग भरला गेला. तिने रोज सकाळी रेल्वे मैदानावर धावण्याचा सराव सुरू केला. सोबतच क्लास लावून सामान्य ज्ञान, गणित व ग्रामरचे शिक्षण घेतले. चाॅंद हिने जिद्दीच्या जोरावर धुळे येथे पोलीस मैदानावर परीक्षा दिली व त्यात ती अव्वल आली.

  लहानपणीच यल्लमा मातेला सोडलं

भुसावळच्या किन्नर मठात राहणारी व यल्लमा मातेला सोडलेली किन्नर चाॅंद ही आता लवकरच राज्याच्या पोलीस दलात दाखल होणार आहे. पोलिसात दाखल होणारी चाॅंद ही राज्यातील पहिली तृतीयपंथी ठरणार आहे. इतर तृतीयपंथीयांनी देखील या संधीचं सोनं करावं.  उच्च शिक्षण घेऊन पोलीस दल किंवा इतर प्रशासकीय सेवेमध्ये रूजू व्हाव असा संदेश यावेळी चॉंद उर्फ बेबो तडवी हिने दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Police