Home /News /maharashtra /

नाशकात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट; महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून फरार, घटनेचा VIDEO

नाशकात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट; महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून फरार, घटनेचा VIDEO

चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी ओढून नेल्याचं पाहायला मिळालं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नाशिक 26 जुलै : जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्याचा घटना अनेकदा समोर येत असतात. आता अशीच आणखी एक घटना समोर आलेली आहे. ही घटना नाशिक शहरातील पवन नगर परिसरातील आहे. यात चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी ओढून नेल्याचं पाहायला मिळालं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुत्रे नाही! घोड्यांनी घेतला 2 तरुणांना चावा, सांगलीमधील खळबळजनक घटना पवन नगर परिसरात एक महिला रस्त्याने जात होती. इतक्यात अचानक समोरून एका दुचाकीवर दोघे जण तिथे आल्याचं पाहायला मिळतं. मात्र, हे दोघं फक्त रस्त्यावरुन आपल्या दुचाकीवर जात आहेत, असं महिलेला वाटलं. महिला समोर चालतच राहिली. इतक्यात दुचाकीस्वाराने गाडी महिलेच्या अगदी जवळ नेली. महिलेला काही कळण्याच्या आधीच मागे बसलेल्या तरुणाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढली. पुणे: रोजचं पोहणं, स्विमिंगमध्ये पटाईत; तरीही मित्रांच्या डोळ्यादेखत महसूल कर्मचाऱ्याचा तलावात धक्कादायक मृत्यू व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की महिला एकटीच रस्त्याने जात आहे. इतक्यात अचानक एका वळणावरुन हे दुचाकीस्वार महिलेच्या जवळ येतात. यानंतर दुचाकीवर मागे बसलेला व्यक्ती महिलेच्या गळ्यात सोनसाखळी लांबवतो. हे सगळं इतकं जलद घडतं की महिलेला याची कल्पना येईपर्यंत चोर दूर गेलेले असतात. ही संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Nashik, Shocking video viral

पुढील बातम्या