मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'शरद पवारांना जाणता राजा म्हणायला...', छगन भुजबळांच्या विधानाने नवा वाद? Video

'शरद पवारांना जाणता राजा म्हणायला...', छगन भुजबळांच्या विधानाने नवा वाद? Video

स्वराज्यरक्षक, धर्मवीरनंतर आता जाणता राजावरून वाद सुरू झालाय. शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केलाय.

स्वराज्यरक्षक, धर्मवीरनंतर आता जाणता राजावरून वाद सुरू झालाय. शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केलाय.

स्वराज्यरक्षक, धर्मवीरनंतर आता जाणता राजावरून वाद सुरू झालाय. शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केलाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक, 5 जानेवारी : नावात काय आहे, असं म्हणण्याऐवजी आता नावात काय नाही? असं म्हणण्याची आता वेळ आली आहे. कारण स्वराज्यरक्षक, धर्मवीरनंतर आता जाणता राजावरून वाद सुरू झालाय. शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केलाय. तर सत्ताधाऱ्यांनी या मुद्यावरून छगन भुजबळांवर तोफ डागलीय.कोणाला काय म्हणायचं ते म्हणा जाणता राजा एकच शिवाजी महाराज असं फडणवीसांनी म्हटलंय.

काय म्हणाले भुजबळ?

'जो राज्यकर्ता असतो त्याला पूर्वीच्या भाषेत राजाच म्हणत होते. या राजकारणातून चार वेळा मुख्यमंत्री झालेले, त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडवले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, नाशिक मुंबईमध्ये 80 टक्के ऑटोमोबाईल कारखाने पवार साहेबांनी आणले. उद्योगधंदा वाढवला. त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत, सामाजिक क्षेत्रात किती लक्ष दिलं. त्यांनी महिलांना आरक्षण दिलं. सरकार गेलं तरी बेहत्तर त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय घेतला, यालाच जाणता राजा म्हणतात,' असं भुजबळ म्हणाले.

'जाणता राजा काय असतो, जो आपल्या जनतेबरोबर त्यांच्या प्रश्नामध्ये एकरूप होऊन ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवतो,' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे. 'कुणाला काय म्हणायचं असेल ते म्हणा. या देशामध्ये जाणते राजे एकच, ते म्हणजे छत्रपती शिवराय. बाकी कुणाला आपल्या नेत्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी ते म्हणावं. जनता नाही म्हणणार,' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाही शरद पवारांना जाणता राजा म्हणत असल्याबाबत काल प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा आमच्या काकांना जाणता राजा म्हणा, असं मी सांगतो का? असा उलट सवालच अजित पवारांनी विचारला.

'ताई नको दादा हवे', शरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची खदखद बाहेर!

First published:

Tags: Chagan bhujbal, Sharad Pawar