मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

छगन भुजबळ नाशिकच्या कालिका मंदिरात, सरस्वतीच्या मूर्तीसमोर येताच...Video

छगन भुजबळ नाशिकच्या कालिका मंदिरात, सरस्वतीच्या मूर्तीसमोर येताच...Video

छगन भुजबळ हे नाशिकच्या कालिका माता मंदिरात दर्शनासाठी आले होते. कालिका माता मंदिर हे नाशिकचं ग्रामदैवत आहे. या मंदिरामध्येच देवीची तीन रूप आहेत, ज्यात महालक्ष्मी, महाकाली आणि सरस्वतीचं रूपही आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Shreyas

नाशिक, 1 ऑक्टोबर : छगन भुजबळ हे नाशिकच्या कालिका माता मंदिरात दर्शनासाठी आले होते. कालिका माता मंदिर हे नाशिकचं ग्रामदैवत आहे. या मंदिरामध्येच देवीची तीन रूप आहेत, ज्यात महालक्ष्मी, महाकाली आणि सरस्वतीचं रूपही आहे. काहीच दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता, त्यामुळे भुजबळांच्या मंदिरात जाण्याला महत्त्व प्राप्त झालं होतं.

नाशिकच्या कालिका माता मंदिरामध्ये छगन भुजबळ यांनी सरस्वतीची पूजा केली आणि या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शाळेमध्ये महापुरुषांची पूजा व्हावी, मंदिरातल्या सरस्वती पूजेला विरोध नाही, असंही भुजबळ यांनी म्हणलं आहे.

महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात संवाद साधताना भुजबळ यांनी देवी देवतांच्या फोटोबाबत आणि त्यांच्या पूजेबाबत विधान केलं होतं, यावरून महाराष्ट्रात वाद झाला होता. यानंतर कालिका माता मंदिरात जाऊन छगन भुजबळ यांनी देवीची पूजा केली. सगळ्यांना शांतता, समाधान लाभू दे, राज्याची उन्नत्ती होऊ दे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

" isDesktop="true" id="768198" >

काय म्हणाले होते भुजबळ?

सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यामुळे भुजबळ यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. माझं मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार या देशात आहे. मी काय देशाच्या विरोधात बोललो नाही. सावित्रीबाई यांनी पहिली शाळा काढली त्यामुळे मी सरस्वती ऐवजी यांचं पूजा करा असं म्हणालो. मी कुठेही सरस्वती देवीची फोटो काढा असे म्हणालो नाही. मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं भुजबळ म्हणाले होते.

दरम्यान छगन भुजबळ यांचं हे वैयक्तिक मत असून ती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नसल्याचं म्हणत अजित पवार यांनी या वादातून हात झटकून घेतले होते.

First published:

Tags: Chagan bhujbal