मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

परवानगी नसतानाही नाशकात बैलगाडा शर्यत; बैल जोडी उधळली अन् दुचाकींवर आदळली, बैलांची शिंग दुचाकीत अडकली

परवानगी नसतानाही नाशकात बैलगाडा शर्यत; बैल जोडी उधळली अन् दुचाकींवर आदळली, बैलांची शिंग दुचाकीत अडकली

Bullock cart race in Nashik:बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाने उठवली. त्यानंतर नाशिकमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Bullock cart race in Nashik:बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाने उठवली. त्यानंतर नाशिकमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Bullock cart race in Nashik:बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाने उठवली. त्यानंतर नाशिकमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 25 डिसेंबर : बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रात सशर्त परवानगी दिली. ही बंदी उठवल्यानंतर आज (25 डिसेंबर 2021) नाशिक जिल्हयात प्रथमच बैलगाडा शर्यतीचं आयोजन (Bullock cart race organised in Nashik) करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या बैलगाडा शर्यतीत एक बैल जोडी उधळली.

नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली असून या शर्यतीत सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणाहून बैलगाडा मालक शर्यतीसाठी आपल्या बैलजोडी घेऊन दाखल झाले आहेत. मात्र, या बैलगाडा शर्यतीत एक बैल जोडी अनियंत्रित झाली आणि शेजारी असलेल्या बाईकवर आदळली. यामुळे दोन्ही बैलांचे शिंग हे गाडीत अडकले. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाहीये.

परवानगी शिवाय बैलगाडा शर्यत

ओझरमध्ये आयोजित बैलगाडा शर्यतीला पोलीस आणि प्रशासनाची परवानगी नसल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. शर्यतीसाठी जिल्ह्याभरातून शेतकरी, बैल जोडी घेऊन ओझरमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, आता बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाला जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी दिली नसल्याने बैलगाडा शर्यत आयोजक आणि शर्यतीत सहभागी झालेले बैलगाडा मालक हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी

बैलगाडा शर्यत आयोजित कऱण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे

बैलगाडा शर्यत संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे असणार

बैलगाडा शर्यती दरम्यान बैलांना क्रूर वागणू देता येणार नाही

काय आहे प्रकरण?

राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली. महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या संदर्भात 2017 मध्ये एक कायदा संमत केला होता. मात्र, त्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने या आदेशाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यात आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला.

न्यायालयाकडून बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाल्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, बैलगाडा शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे शेतकरी नाराज झाले होते ही बंदी उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर आज बैलगाडा शर्यतीला परवानी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निश्चितच सर्वांना आनंद झाला आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की, ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवनागी दिली आहे त्यानुसार सर्वांनी नियमांचे पालन करुनच शर्यतीचं आयोजन करावं.

First published:

Tags: Nashik, Supreme court, महाराष्ट्र