मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मर्सिडीजनंतर आता BMW कार, महामार्गावर काही क्षणात झाला कोळसा, LIVE VIDEO

मर्सिडीजनंतर आता BMW कार, महामार्गावर काही क्षणात झाला कोळसा, LIVE VIDEO

 बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये कारचा भडका उडाला. बघता बघता कार आगीच्या भक्षस्थानी सापडली.

बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये कारचा भडका उडाला. बघता बघता कार आगीच्या भक्षस्थानी सापडली.

बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये कारचा भडका उडाला. बघता बघता कार आगीच्या भक्षस्थानी सापडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  sachin Salve

नाशिक, 03 ऑक्टोबर :  टाटा सन्सचे माजी चेअरमॅन सायरस मिस्त्री यांचा मर्सिडीज कारमध्ये असताना मृत्यू झाल्यामुळे कारच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.  अशातच नाशिकमध्ये BMW कारचा एक व्हिडीओ समोर आला आहे. महामार्गावरच BMW कारने पेट घेतला. या अपघातात 2 जण थोडक्यात बचावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर रविवारी रात्री ही घटना घडली. पुणे मार्गावर उपनगर सिग्नलजवळ ही घटना घडली. सिग्नलवर आलेल्या या BMW कारने अचानक पेट घेतला. अचानक पेट घेतल्यामुळे कारमधील कुटुंबीयांनी बाहेर धाव घेतली. बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये कारचा भडका उडाला. बघता बघता कार आगीच्या भक्षस्थानी सापडली.

BMW कारला आग लागल्यामुळे स्थानिकांनी तातडीने याची माहिती उपनगर अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पूर्णपणे कारने पेट घेतला होता.

(धावत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न भोवला; तोल गेला अन्..., पनवेल स्टेशनवरील घटनेचा Video)

पाण्याचा मारा करून तासाभराच्या मेहनतीनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कार आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. कारच्या  डॅशबोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

जळगावमधील म्हसावद महामार्गावर ट्रक उलटला

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील म्हसावद महामार्गावर  ट्रकला अपघात झाला आहे. म्हसावद गावातून जाणारा महामार्ग रस्त्यावर राज्यस्थानवरून येणारा ट्रक खड्ड्यामुळे पलटी झाला.  एक दोन वेळा पलटी  मारून ट्रक रस्त्यावर पडला. सुदैवाने  सकाळी लोक व गावातील नागरिक कमी असल्यानेआणि शाळेत जाणारे- येणारी मुले व मुलींचा वापर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

(Video : 50 जणांमध्ये कॅमेऱ्याची नजर त्याच्यावरच, गरबा खेळता खेळता कोसळला अन् मृत्यू)

जर पर्याय व्यवस्था रस्त्याची असती तर आज हा ट्रक पलटी झाला नसता. या गावातून जाणाऱ्या महामार्गाचे काम कासव गतीने सुरू आहे. ठेकेदाराने कुठलीही पर्याय रस्त्याची व्यवस्था गावातील पायी चालणाऱ्या लोकांना केलेली नाही, असा आरोप केला. या रस्त्यामुळे मागील वर्षापूर्वी आंदोलन ही गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते.

First published: