Home /News /maharashtra /

सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला तर तेरा क्या होगा कालिया? सोमय्यांची अनिल परबांवर खोचक टीका

सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला तर तेरा क्या होगा कालिया? सोमय्यांची अनिल परबांवर खोचक टीका

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

अनिल परब यांनी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधलं. सचिन वाझे जर माफीचा साक्षीदार झाला तर तेरा क्या होगा कालिया? असा सवाल करत किरीट सोमय्यांनी टीका केली.

मुंबई, 5 जून : शंभर कोटी वसूल प्रकरणी अटकेत असलेला निवृत्त एपीआय सचिन वाझेला (Sachin Vaze) कोर्टाने माफीचा साक्षीदार घोषित केला आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची झोप उडाली आहे, असा गंभीर दावा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. ते नाशिकच्या निफाड रुई कांदा परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अनिल परबांना उद्देशून कालिया असा उल्लेख केला. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यांच्या या टीकेवर शिवसेनेकडूनदेखील तिखट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. "सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार आहे. त्याला कोर्टाने मान्यता दिली आहे. त्यामुळे झोप कुणाची उडालीय? अनिल परब यांनी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधलं. सचिन वाझे जर माफीचा साक्षीदार झाला तर तेरा क्या होगा कालिया? लवकरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शेजारी राहायला जावे लागणार", अशी मिश्किल टीका किरीट सोमय्यांनी केली. अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता अनिल परबही जेलमध्ये जाणार, असा दावा सोमय्यांनी केला आहे. "सचिन वाझेची नियुक्ती कोणी केली? न्यायालयाने त्याला नोकरीतून काढूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याला नोकरीला घ्यावे म्हणून आग्रह केला. तरीही फडणवीसांनी वाझेला नोकरीवर घेतले नाही. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच तो कामावर आला. ठाण्याचे हिरे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने मला विचारले, आमचा दोष काय? पण आता या प्रकारणात मुख्यमंत्र्यांची झोप उडणार", असादेखील दावा सोमय्यांनी यावेळी केला. (गोपीचंद पडळकरांची पुन्हा जीभ घसरली, शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका) "उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्याची काळजी नाही. त्यांना फक्त कुटुंबातील सदस्यांची काळजी आहे. त्यांना किरीट सोमय्या यांचा धाक आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याशी अॅग्रिमेंट केले. जमीन स्वतःच्या नावावर केली. 19 बंगले रश्मी यांच्या नावे ग्रामपंचायतने केले. रश्मी यांनी त्या बंगल्यांची पाणीपट्टी भरली. मी लवकरच 19 बंगले प्रकरणात कोर्टात याचिका दाखल करणार", असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. "संघर्ष कसे करावे यात भारतातले टॉप टेन काढले तर गोपीचंद पडळकर यांचा नबर असेल. माझं शिक्षण झालंय पण मला शेतीतील अर्थकारण कळाले नाही. सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मुख्यमंत्री रोज रात्री हिशोब मागतात. उद्धव ठाकरे यांचा कलेक्शन एजंट कोण? तर अनिल परब! स्वतःच्या पक्षातील आमदारांना बिकाऊ आहे, असे म्हणणारे कोण? असे म्हणणारे गाढाव आहेत", अशी टीका सोमय्यांनी केली. "मी कांदा उत्पादकांच्या सोबत राहील. इथे असलेला दोन रुपये किलो कांदा मुंबई तीस रुपये किलोने विकला जातो. यावर उपयोजना काय? मोदी सरकारने मोठ्या प्रमाणावर गहू निर्यात केला. शरद पवार लाल गहू आयात करून गरिबांना देत होते. मोदी सरकारने 80 कोटी नागरिकांना मोफत गहू दिला. आगामी काळात सदाभाऊ यांच्या आंदोलनाला यश येऊन मोदी सरकारच्या माध्यमातून कांदा उत्पादकांना नक्कीच चांगले दिवस येतील. सरकारने शेतकऱ्यांकडून थेट कृषीमाल खरेदी करावा आणि ते लवकरच होईल. मला शेती कळत नाही मात्र अर्थकारण समजून घेतोय. शेतकरी फुकट मागत नाही. फक्त त्याचे शोषण होऊ नये ही अपेक्षा", असं सोमय्या म्हणाले.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या