मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भव्य स्वामी नारायण मंदिर भक्तांसाठी खुले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना संपन्न

भव्य स्वामी नारायण मंदिर भक्तांसाठी खुले, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना संपन्न

नाशिकच्या तपोवन परिसरात भव्य बीपीएस स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले आहे. या नव्याने झालेल्या स्वामीनारायण मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला

नाशिकच्या तपोवन परिसरात भव्य बीपीएस स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले आहे. या नव्याने झालेल्या स्वामीनारायण मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला

नाशिकच्या तपोवन परिसरात भव्य बीपीएस स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले आहे. या नव्याने झालेल्या स्वामीनारायण मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  sachin Salve

नाशिक, 28 सप्टेंबर : नाशिकमध्ये गेल्या चार वर्षांपासून काम सुरू असलेले भव्य बीपीएस स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नव्याने झालेल्या स्वामीनारायण मंदिरातील मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहे. नाशिकच्या तपोवन परिसरात भव्य बीपीएस स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले आहे. या नव्याने झालेल्या स्वामीनारायण मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला आहे. गोदावरी तीरी तपोवन परिसरात स्वामीनारायणाची भव्य दिव्य मंदिर तयार करण्यात आले आहे.

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे. मंत्र भूमी म्हणून देखील नाशिकचा उल्लेख केला जातो. मराठी पण चालेल ना असं विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठीत भाषण केलं.

'मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम वेळी देखील मी आलो होतो. पण आज लोकार्पण सोहळ्यात मी मुख्यमंत्री म्हणून आलो हे स्वामीनारायण यांचा आशीर्वाद आहे, अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

'गोदावरी तटावर नाशिक नगरी वसलेली आहे. कुंभ नगरी म्हणून देखील नाशिकची ओळख आहे. अशा या कुंभनगरीत हे एक भव्य मंदिर साकरण्यात आलंय. हे मंदिर शहराची शोभा वाढवेल. कोरोना काळ असताना देखील हे मंदिराचे काम 3 वर्षात पूर्ण झाले. दोन महिने पाहिले राज्यात नवीन सरकार आलंय, हे तुमचं आणि सर्वांचे सरकार आहे. या दोन महिन्यात सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा काम सरकार करत आहे, असंही शिंदे म्हणाले.

(Nashik : गोदावरीच्या काठावर साकारलंय भव्य स्वामीनारायण मंदिर, Video)

कोरोना काळात जे निर्बंध लावण्यात आले होते. ते सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहेत निर्बंध मुक्त उत्सव साजरे आता होत आहेत. आमच्या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील आशीर्वाद आहे. सगळ्यांच्या मनात असलेला सरकार आम्ही स्थापन केलंय, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

स्वामी नारायण मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

तपोवन केवडीबन येथे उभारण्यात आलेल महाकाय स्वामी नारायण मंदिर बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. स्वामीनारायण मंदिरात दहा दिवस साजरा होत असलेल्या या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात नाशिक गुजरात मुंबई पुणे खानदेशासह देश विदेशातून लाखो हरी भक्त उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाची आखणी शिस्तबद्ध आणि नियमानुसार व्हावी यासाठी जवळपास एक हजार स्वयंसेवक भक्तीच्या भावनेनं सेवा देत आहे.

गुगल मॅपवरून साभार

स्वामी नारायण मंदिराचा पत्ता

BAPS श्री स्वामी नारायण मंदिर, पंचवटी, नाशिक  तपोवन केवडीबन, पिन कोड : 422003

First published: